६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 574

५३४ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

तुमच्या धंदेवाईक समाजसेवेच्या अमदानीत तुम्ही काही केलेत का ? वीस

वर्षाच्या समाजसेवेच्या कारकिर्दीत श्री. ठक्कर बाप्पा रानटी जमातीतून एकही

पदवीधर निर्माण करू शकले नाहीत ही गोष्ट त्यांच्या समाजसेवेस काळीमा

फासणारी आहे.

दुसरे असे की या जमातीला विधिमंडळात अधिक प्रतिनिधीत्व देण्यात यावे

असे एकाएकी श्री. ठक्कर यांना का वाटायला लागले हे ते सांगतील काय ?

य़ा जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण पाहाता १९३५ च्या कायद्यात त्यांना

लोकप्रतिनिधीत्व अगदीच क्षुल्लक आहे. मग श्री. ठक्कर यांनी या कायद्याविरुद्ध

कधी ओरड केली आहे का ? सप्रु कमिटीच्या विरुद्ध कधी त्यांनी ब्र काढला आहे

का ? माझ्याविषयी श्री. ठक्कर बाप्पांचा जो दुराग्रह आणि द्वेष आहे, तो इतरांच्या

बाबतीत नाही हेच याचे खरे कारण. ॒

तिसरी गोष्ट ही की रानटी जमातीस कायदेमंडळात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंबहुना अधिक जागा मिळाल्या पाहिजेत असे जर श्री. ठक्कर यांना वाटत असेल तर याकरता मुसलमानांच्या जागात कपात केली गेली तरच हे शक्य होईल. मग रानटी लोकांचा लढा लढविण्यासाठी मुसलमानांशी टक्कर देण्याची श्री. ठक्कर यांची तयारी आहे काय ? अस्पृश्यांच्या जागात कपात करून ते अस्पृश्यांविषयीचे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात अजूनपर्यंत ज्यांना लोकप्रतिनिधीत्व मिळाले नाही अशा कमकुवत अस्पृश्य समाजाविरुद्ध शस्त्र उगारून ते (श्री. ठक्कर) मर्दुमकी गाजवू पहात आहेत. मुसलमानांना मिळत असलेल्या जादा अधिकारातून जर ते रानटी लोकांना काही घेऊन देऊ शकले तरच त्यांचे यांच्यावरील प्रेम आणि नायकत्व सिद्ध होईल.

| |

बी. आर. आंबेडकर."