२२० .
अस्पृश्य समाजाची सर्वात सुंदर आणि
उपयुक्त इमारत व्हावी |
सोमवार, तारीख १४ मे १९४५ रोजी संध्याकाळी सहा वाजता शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन मुंबई शहर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दामोदर हॉलच्या पाठीमागील बगीच्यात चहापार्टी देण्यात आली. त्यावेळेस सर्व वॉर्डातील सभासद, मध्यवर्ती समिती आणि डॉ. बाबासाहेब यांचा ग्रुप फोटो घेण्यात आला. तदनंतर चहापान झाल्यावर डॉ. बाबासाहेबांना बोलण्यास विनंती करण्यात आली. त्यावेळेस डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास
उठले. ते म्हणाले,
आज या ठिकाणी हा जो प्रसंग घडून आला आहे.त्या प्रसंगानिमित्त मी बोलावे
अशी इच्छा प्रदर्शित करण्यात आल्यावरुन दोन शब्द सांगणे .मला उचित
वाटते. | |
ही जी परिषद झाली तीत आपण सर्वांनी जी मेहनत घेऊन अपूर्व यश साधलेत त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. |
आज ही एवढी मोठी परिषद झाली तिचा सगळीकडे गवगवा झाला आहे इतकेच
नव्हे तर आपले शत्रु असलेल्या सर्व वर्तमानपत्रांनी तिच्या यशस्वीतेबद्दल मनसोक्त स्तुती केली आहे. या परिषदेच्या निमित्ताने तुम्ही जी एकजूट दाखविली आहे ती अभिनंदनीय आहे. तुम्ही जे कार्य केले ते आता संपले, आता आपल्याला घरी बसायला हरकत नाही असे समजू नका. क क
आपल्याला एक मोठे कार्य करावयाचे आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्याला एक मोठा हॉल बांधायचा आहे. त्यासाठी आपण सदतीस हजार रुपये खर्च करुन जागा घेतलेली आहे. लढाईमुळे त्याचे बांधकाम हातात घेता आले नाही परंतु लढाई संपल्यावर त्या कामाला सुरुवात करण्यात येईल. लढाई जवळ जवळ संपत आली आहे, तेव्हा सहा महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असे म्हणायला हरकत नाही. या हॉलला दोन लाख रुपये खर्च येईल ही कल्पना मी आपणास दिलेलीच आहे. आपण जो हॉल बांधणार आहोत तो इतका सुंदर झाला पाहिजे की त्यासारखा हॉल मुंबईत शोधून मिळता कामा नये. कुणी प्रतिष्ठित पाहुणा जर इथे आला आणि त्याने सर्व हॉल पाहावयाचे
जनता : १९ मे १९४५.