५३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ठरविले व त्याबद्दल त्याला मत द्यावयाचे झाले तर सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ
प्रकारचा हॉल जर कोणाचा असेल तर तो अस्पृश्यांचाच. असे उदगार त्याने
काढायला पाहिजेत. बाकी ह्या हॉलला आपलाच पैसा लागला पाहिजे ही गोष्ट
मात्र तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आपला हॉल आपणच बांधला तरच
आपली इभ्रत राहाणार आहे. |
या बाबतीत आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे अठरा वर्षांवरील प्रत्येक स्त्री-पुरुषाने एक रुपया द्यावयाचा आहे. यासाठी आजतागायत गोळा झालेली रक्कम बँकेत ठेवण्यात आली असून त्याचा हिशोब श्री. शा. अ. उपशाम यांचेकडे आहे.
परिषदेच्या कामानिमित्त वार्ड कमिट्यांची जी संघटना झालेली आहे त्याद्वारे हा पैसा गोळा केला तर ते अधिक सुलभ होईल.
आपल्यातील जे गोरगरीब आहेत त्यावर अवलंबून राहिलो तर पुरेसा पैसा गोळा होईल याबद्दल मला खात्री देता येत नाही, तेव्हा मला वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीतकमी पंचवीस रुपये द्यावेत. आपली इमारत पूर्णपणे तयार झाल्यावर मी इतिहास लिहिणार आहे. त्या इतिहासात पंचवीस रुपये देणाऱ्याचा फोटो देण्यात येईल. त्या लोकांना ही अमूल्य संधी आहे असे मला वाटते.
वॉर्डातील लोकांनी त्यांच्या वॉर्डामधून पंचवीस रुपये देणारे इसम निवडावे, त्यांच्या पाठीशी लागून मी सांगितलेली रक्कम गोळा करावी.
हे जे पैसे गोळा करावयाचे आहेत ते अधिवेशनासाठी अंगिकारण्यात आलेल्या पद्धतीप्रमाणेच करावे.
आज मला जे सांगावयाचे होते ते मी सांगितले. शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाचे अभिनंदन करून रजा घेतो.
डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर मडकेबुवा यांनी आभारादाखल बोलल्यावर हा गोड समारंभ संपला,