३-१०-१९४५ व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन कर- ण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय - Page 577

२२१

व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे

मूलभूत माप म्हणजे राजकारण होय

बुधवार ता. ३ ऑक्टोबर १९४५ रोजी पुणे येथील 'अहिल्याश्रमाचे' जागेत ' आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स्‌ ' या संस्थेचा उद्घाटन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ते मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी राजकारणाच्या अभ्यासूंना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रचलित हिंदी राजकारणाचे शास्त्रशुद्ध ज्ञान देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत विद्वत्ताप्रचुर असे भाषण केले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या या भाषणात विशेषतः गांधींनी हिंदी राजकारणात पदार्पण केल्यापासून काँग्रेसला तत्त्वहीन आणि बुद्धिहीन मेंढरांच्या कोंडवाड्याचे स्वरुप कसे दिले आहे व त्यामुळे देशाचे किती भयंकर नुकसान झाले आहे याचे अत्यंत मार्मिक विवेचन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

राजकारणाचा अभ्यास करण्याच्या ज्या उद्देशाने ही संस्था उघडण्यात आली ` आहे तो उद्देश मला मान्य आहे. तुमचा माझ्यावर आत्यंतिक विश्वास असल्यामुळे आज मी माझे विचार मनमोकळेपणाने तुमचे पुढे मांडणार आहे.

कोणत्याही पिढीतील लोकांपुढे त्यांच्या काळातील जे महत्त्वाचे प्रश्‍न असतील ते प्रश्‍न स्वतंत्रपणे विचार करून सोडविण्याचे स्वातंत्र्य त्या लोकांना असलेच पाहिजे. जो समाज पारतंत्र्यात जखडला गेला असेल त्या समाजाने

स्वातंत्र्यासाठी अहर्निश लढा दिलाच पाहिजे.

काही विशिष्ट विचार पवित्र मानले जाऊन त्यांचा अवलंब अव्याहतपणे

पिढ्यान्‌ पिढ्या केला जाईल अशी नेतिक बंधने घातलेली विचारसरणी

समाजाच्या रोमरोमी भिनून गेली तर तो समाज शेवटी अधोगतीला जाणार यात

मुळीच शंका नाही. महंमद पेगंबर, येशू ख्रिस्त हे महान तत्त्ववेत्ते असू

शकतील. पैगंबराचे ' कुराण ', ख्रिस्ताचे ' बायबल ' व श्रीकृष्णाची ' गीता '

ह्या धर्मग्रंथांचा विचार करा. कुराणात महंमद पैगंबराने जे जे म्हटलेले आहे,

बायबलामध्ये येशू खिस्ताने जे काही सांगितले आहे व गीतेत श्रीकृष्णाने जे काही

निवेदिले आहे ते सर्वच्या सर्वच ' यावच्चंद्रदिवाकरौ ' सत्य आणि प्रमाणभूत

जनता : १३ ऑक्टोबर १९४५.