३-१०-१९४५ व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन कर- ण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय - Page 578

५३८ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

मानण्यात यावे. असे बंधन घालण्यात आल्यामुळे माणसाच्या बुद्धीला कायमचा

'खो' देण्यात आला आहे. त्यामुळे सत्य कोणते, असत्य कोणते, आपल्या

उद्धाराचा मार्ग कोणता, अधोगतीला जाण्याचा मार्ग कोणता हे समजावून

घेण्याचाही प्रयत्न कोणी करू शकत नाही. ही गोष्ट बहुजन समाजाच्या व

देशाच्या दृष्टीने सर्वस्वी विघातक आहे. तुम्ही मला देव मानीत नाही हे मी माझे

सदभाग्य समजतो. मी आजतागायत तुम्हाला जे जे सांगितले आहे ते ते तुमच्या

बुद्धीला पूर्णपणे पटेल याच भूमिकेवरून सांगितले. बुद्धीच्या कसून केलेल्या

परीक्षणातून तावून सुलाखून निघालेल्या गोष्टीच मी आजपर्यंत प्रतिपादित आलो

आहे. माझा धर्म कायद्यावर किंवा काही विशिष्ट तत्त्वावर आधारलेला नसेल

पण त्यात ' वास्तवता ' मात्र तुम्हाला नक्कीच आढळेल.

प्रत्येकाने हे अवश्य लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक पिढीसमोर जे निरनिराळे

प्रश्‍न उभे असतात ते प्रश्‍न सोडविण्यासाठी मागच्या पिढीतील लोकांच्या विचारांचाच आधार घेऊ म्हटले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असा विचार करा की जर आपणाला एखादा राजकीय प्रश्‍न सोडवावयाचा असला तर लो. टिळक हयात असते तर त्यांनी तो प्रश्‍न कसा सोडविला असता हे पाहून जर आपण आपल्या पुढील आजचा प्रश्‍न सोडवू तर तो यशस्वीरित्या सुटू शकणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे

मनुष्यप्राण्याला जन्मतःच राजकारणाचे ज्ञान असते, असे जर कोणी म्हणत असेल तर ते म्हणणे मूलतःच चुकीचे आहे. उलट मी तर असे म्हणेन की मनुष्यमात्रामध्ये राजकीय दृष्टिकोन निर्माण करणे ही फार कठीण किमया आहे. माझ्या या म्हणण्यास इंग्लंडच्या इतिहासाची पाने साक्ष देतील. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय.

गांधी हिंदी राजकारणात घुसण्यापूर्वी आपल्या देशात राजकारणाचे धडे देणाऱ्या दोन शाळा-मतप्रणाली होत्या. एक रानडे-गोखले या उदार- मतवाद्यांची (198781 8ला०००॥॥०५७॥७) व दुसरी बंगालमधील क्रांतिवाद्यांची (School of Revolutionaries ). उदारमतवाद्यांच्या शाळेत निर्बुद्धांना दाखल करण्यात येत नसे व क्रांतिवाद्यांच्या शाळेत तत्त्वहीन लोकांना प्रवेश मिळ शकत नव्हता. रानडे-गोखल्यांच्या शाळेत बुद्धिवाद्यांनाच दाखल होता येत होते. ज्ञान संपादन व अभ्यासूवृत्ती यावरच त्यांचा अधिक भर असो. राजकारणात पारंगत असलेल्यांनाच उदारमतवाद्यांच्या शाळेत स्थान असे.