३-१०-१९४५ व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन कर- ण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय - Page 579

व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे . . . . . म्हणजे राजकारण होय ५३९

क्रांतिवाद्यांच्या शाळेचेही अत्यंत कडक नियम होते. प्राणावर तिलांजली

देण्याची प्रतिज्ञा घेतलेल्यांनाच त्या संप्रदायात घेण्यात येत असे. परंतु गांधींनी उघडलेल्या शाळेचा दरवाजा केवळ निर्बुद्धांना व तत्त्वहीन लोकांनाच सताड उघडा ठेवण्यात आला. काँग्रेसच्या राजकारणात बुद्धिवाद्यांना बिलकूल स्थान नाही. म्हणून बुद्धिवाद व अभ्यासूवृत्ती यापासून काँग्रेसवाल्यांची पुरीच फारकत झालेली आहे, असे स्पष्ट म्हणणे भाग आहे.

काँग्रेस श्रेष्ठींना राजकारण कशाशी खातात याचे मुळीच ज्ञान नाही. यामुळे काँग्रेसच्या राजकारणाला वेळोवेळी जोरदार ठोकरा बसल्या व त्यामुळे देशाचे आणि बहुजन समाजाचे लवकर भरून न येणारे असे अपरिमित नुकसान झाले आहे. जातीय सलोख्याचा प्रश्‍न आजपर्यंत जो लोंबकळत राहिला आहे तो काँग्रेसवाल्यांच्या निर्बुद्धपणामुळे, अभ्यासहीनतेमुळे व तत्त्वशून्यतेमुळेच. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँक्टमध्ये व्यापाराबाबतच्या संरक्षणासंबंधीचे ५१ वे जे कलम आले आहे. ते केवळ एका माणसाच्या शुद्ध मूर्खपणामुळेच. |

प्रत्येक पक्षाने आपल्या ध्येयसिद्धीसाठी सतत लढत राहिले पाहिजे. प्रत्येक पक्षात बुद्धिवादी लोक असलेच पाहिजेत. ज्ञान ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. मी रानडे-गोखले यांच्या तत्त्वप्रणालीचा असल्यामुळे मला अभिमानपूर्वक समाधान वाटते. |

७ ७ ७