४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 580

२२२
आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये
आपण भागीदार झालेच पाहिजे

आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या

वर्किंग कमिटीची बैठक पुण्याच्या अहिल्याश्रमाच्या हॉलमध्ये ता. २ ऑक्टोबर

१९४५ ते ता. ४ ऑक्टोबर १९४५ पर्यंत भरून अनेक महत्त्वपूर्ण ठराव पास

करण्यात आले. वर्किंग कमिटीच्या सर्व बैठकीस भारतीय दलित वर्गाचे

एकमेव पुढारी ने. ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खास आमंत्रणावरून

हजर होते. वर्किंग कमिटी ज्या हॉलमध्ये बसत होती तो हॉल उत्तम

प्रकारे श्रृंगारण्यात आला होता. वर्किंग कमिटीच्या बैठकीस अध्यक्ष

रा. ब. एन. शिवराज व श्री. ई. डी. वाडापल्ली, श्री. एस. सालेना

(मद्रास), श्री. जे. एन. मंडल, श्री. आर. एल. विश्वास (बंगाल), श्री. डी. एल.

पाटील, श्री. खंडारे (मध्यप्रांत) व मुंबई प्रांतातील श्री. बी. के. गायकवाड, .

श्री. आर. आर. भोळे, श्री. बी. एच. वराळे हे वर्किंग कमिटीचे सन्माननीय सभासद

आणि श्री. पी. एन. राजभोज, जनरल सेक्रेटरी हजर होते. वर्किंग कमिटीच्या

निर्णयाचे आलोचन करण्याकरिता व आपले पूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांचे दर्शन घेण्याकरिता अनेक प्रांतातील शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे

कार्यकर्ते पुण्यास गोळा झाले होते. ठिकठिकाणच्या प्रांतातून अनेक डेप्युटेशन्स घेऊन लोक आलेले होते. प्रांताप्रांतातून तारांचा जणू पाऊस पडत होता. या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी होत असलेल्या वर्किंग कमिटीच्या निर्णयाकडे साऱ्या भारतीय दलितवर्गाचे एकसारखे डोळे लागलेले असल्यामुळे या बैठकीस अत्यंत महत्त्व प्राप्त झाले होते.

यो बैठकीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोमवार ता. १ ऑक्टोबर १ ९४५ रोजी रात्री मुंबईहून रवाना झाले. मंगळवार ता. २ ऑक्टोबर १९४५ रोजी पहाटे पुणे स्टेशनावर आपल्या पूज्य पुढाऱ्यांच्या सत्कारासाठी व दर्शनासाठी अनेक लोक हजर होते. डॉ. बाबासाहेब पुणे स्टेशनावर उतरताच ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ' ' आंबेडकर-जिंदाबाद ' इ. गगनभेदी घोषणांनी सर्व वातावरण भरून गेले.

|

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रा. ब. शिवराज अहिल्याश्रमात पोहोचताच तेथेही त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात वर्किंग कमिटीच्या कामास सुरवात झाली.

जनता आणि 0

es

ति आँक्टोबर ट्ट जनता : ६ आणि १३ ऑक्टोबर १९४५.