२५-१-१९३७ भूलथापास बळी न पडता सावधगिरीने वागले पाहिजे - Page 59

बळी न पडता . . . - . वागले पाहिजे २१ भूलथापास

आपणास अजून पुष्कळ मिळवावयाचे आहे व ते उद्धार होणार नाही.

मिळविण्याकरिता तुम्ही आता अगदी सावधगिरीने वागले पाहिजे. श्री. मेढे यांन!

त्याला मदत लोक आहेत असे ऐकतो. पण ते का मदत करणारे काही मास्तर

त्यात एक कारण दिसते तेहेकी करतात त्याचे कारण समजत नाही. पण

मेढे हा स्कूलबोर्ड मेंबर आहे व त्याची पार्टी सोडल्यावर आपली बदली करेल. पण त्या मास्तर लोकांना मला हे सांगावयाचे की, मेढे काही कायमचा सिंहासनावर बसला नाही. तो या वर्षी आहे तर पुढे नाही. समजा पुढील वेळी श्री. जाधव स्कूलबोर्डात निवडून आले तर मग हे मास्तर लोक कोणाच्या तोंडाकडे पहातील ? मला तुम्हाला हे सांगावयाचे की, माझे कर्तव्य मी पार पाडले आहे आता तुमचे कर्तव्य राहिले आहे. कोणाच्या भुलथापास बळी न पडता तुम्ही

अगदी सावधगिरीने वागले पाहिजे.

श्री जाधवांजवळ काही मोटार गाड्या नाहीत किंवा पैसा नाही. तुम्ही घरची भाकरी पाठिशी बांधून पोलीस स्टेशनवर गेले पाहिजे. या देशात मत

देणे म्हणजे उमेदवारावर उपकार करणे असा समज झाला आहे पण तो खरा

नाही. उमेदवार जाणार तो कोणाकरिता जातो हे समजाऊन घेतले

पाहिजे. उमेदवार हा तुमची गाऱ्हाणी सांगण्याकरिता व त्याचे निवारण कसे

करावयाचे याचे कायदे करण्याकरिता जात असतो. आपणास जे काही

मिळवावयाचे ते कायद्याने मिळणार आहे अशी स्थिती लक्षात घेऊन तुम्ही

श्री. जाधव यांनाच आपली सर्व मते देऊन निवडून आणावे, अशी विनंती करून

त्यांनी भाषण संपविले. भाषण झाल्यावर सर्वानी जाधवांनाच मते देण्याची

जाहीर घोषणा केली.

EO ®