आपल्या प्रगतीसाठी देशाला . . . . . झालेच पाहिजे ५४१
पहिला दिवस |
मंगळवार ता. २ ऑक्टोबर १९४५ रोजी बरोबर २ वाजता वर्किंग कमिटीची मिटिंग रा. ब. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शितत्वाखाली सुरू झाली. प्रथम अस्पृश्य समाजाचे एक मान्यवर पुढारी मद्रासचे रा. ब. श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःखप्रदर्शक ठराव अध्यक्षांनी मांडला व त्यांच्या बहुमोल कार्यांची स्तुती केली. नंतर ठराव सर्वानी उभे राहून मंजूर केला. नंतर आपल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येऊन सध्याची जागतिक परिस्थिती व हिंदी राजकारण याबाबत विचारविनिमय करून आपल्या पक्षाचे पुढील धोरण कसे असावे याची स्थूल रुपरेषा आखण्यात आली व त्या दिवसाचे कमिटीचे कामकाज संपले. नंतर संध्याकाळी पेठ मंगळवार येथे रा. ब. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या वार्ड कमिटीमार्फत प्रचंड सभा झाली. जनसंमर्द ५ हजारावर होता. रा. ब. शिवराज यांचे अस्पृश्य समाज व आगामी निवडणुकी याविषयावर दणदणित भाषण झाले. या सभेस वर्किंग कमिटीचे सर्व सभासद हजर होते. सदर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड जयघोषात विसर्जन पावली. नंतर लगेच दुसरी सभा भोर संस्थान दलित फेडरेशनतफे घेतली होती. तेथेही ४ हजार जनसमुदाय होता. रा. ब. शिवराज अध्यक्षस्थानी होते. या सभेत कमिटीतील अनेक सभासदांची भाषणे झाली. उत्साह फार दांडगा होता.
' निवडणुकीत प्रतिपक्षाची पुरी भंबेरी उडवून शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवारांसच यशस्वी करा ' असा सर्व वक्त्यांनी आदेश दिला व सभेचे काम संपले. नंतर संध्याकाळी सुमारे ९ वाजता अहिल्याश्रमातच डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, रा. ब. एन. शिवराज व वर्किंग कमिटीचे सभासद यांना थाटाची मेजवानी देण्यात आली. अशा प्रकारे पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार
पडला.
दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. ३ ऑक्टोबर १९४५ रोजी सकाळी १० वाजता वर्किंग
कमिटीची बैठक रा. ब. शिवराज यांचे अध्यक्षतेखाली भरून ती दुपारी ३ वाजेपर्यंत
चालू होती. या बैठकीत वर्किंग कमिटीने अत्यंत महत्त्वाचे ठराव, दीर्घ
विचारविनिमयानंतर पास केले. सदर बैठकीस सुरवातीपासून अखेरपर्यंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.