४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 582

५४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या वर्किंग कमिटीने

पास केलेले ठराव

ठराव १ ला---

औं. इं. शे. का. फेडरेशनची ही वर्किंग कमिटी, आपले पूज्य पुढारी राव बहादूर

आर. श्रीनिवासन यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रदर्शित करते आणिं त्यांनी

शेड्यूल्ड कास्ट्स्‌च्या उद्धाराकरिता केलेल्या बहुमोल कार्याची चिरंतन आठवण

गुणग्राहकतापूर्वक नमूद करून, त्यांच्या मृत्युमूळे आपल्या जमातीचे फार मोठे

नुकसान झाले आहे असे मोठ्या दुःखित अंतःकरणाने जाहीर करते.

ठराव २ रा---

मध्यवर्ती सरकारची पुनर्रचना

ब्रिटिश साम्राज्य सरकारने हिंदी मध्यवर्ती सरकारच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या घोषणेवर औँ. इं. शे. कास्ट्स्‌ फेडरेशनच्या या वर्किंग कमिटीने सांगोपांग विचार केलेला आहे. सरकारी घोषणेनुसार स्वतंत्र हिंदुस्थानकरिता राज्यघटना तयार करण्याची सुवर्ण संधी हिंदी लोकांनाच देण्याबद्दल ताबडतोब तजविजी करण्यात येणार आहेत हे जरी सत्य असले तरी, सरकारच्या प्रस्तुत योजनेला, ही वर्किंग कमिटी आपली मान्यता मुळीच देऊ शकत नाही. |

वर्किंग कमिटीच्या मते, मध्यवर्ती सरकारच्या प्रचलित कायदे मंडळाची रचनाच इतकी अप्रातिनिधीक आहे की, जगात अशा प्रकारचे अप्रातिनिधीक कायदे मंडळ हेच पहिले असेल ! या मध्यवर्ती कायदे मंडळाच्या निवडणुकीकरिता मतदान करणाऱ्या लोकांना इतकी अवजड लायकी ठेवण्यात आलेली आहे की, त्यामुळे देशातील वयात आलेल्या लोकांपैकी नऊ दशांशापेक्षाही जास्त लोकांचा मतदानाचा न्याय्य हक्क हिरावून घेण्यात आलेला आहे.

या मध्यवर्ती कायदे मंडळात शेड्यूल्ड कास्ट्स्‌ आणि हिंदी खिश्चन यांना कायद्याने मुळीच प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही.

अशा अप्रातिनिधीक मध्यवर्ती कायदे मंडळाची निवडणूक करणे पूर्णपणे गैर आहे असे या वर्किंग कमिटीचे स्पष्ट मत आहे.

अशा अप्रातिनिधीक कायदेमंडळाची निवडणूक करून, त्या कायदेमंडळातून पुनर्रचित असे मध्यवर्ती सरकार निर्माण करणे, म्हणजे, देशाची राजसत्ता सर्वस्वी सत्तामदांध अशा मूठभर अप्रातिनिधीक लोकांच्या हवाली करण्यासारखे आहे, असेच या वर्किंग कमिटीस वाटते.

|