४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 584

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४४

ठराव ४ था

प्रांतिक विधिमंडळाचा घटना समितीशी संबंध

औं इं. शे. का. फेडरेशनच्या वर्किंग कमिटीचे असे निश्चयात्मक मत आहे

की, घटना समितीच्या निर्मितीकडे प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीचा संबंध

जोडण्याचा प्रयत्न करणे ही ब्रिटिश सरकारची घोडचूक आहे. या बाबींवर खोल

विचार करून ही वर्किंग कमिटी असा निर्णय घेते की, खाली दिलेल्या कारणांमुळे

प्रांतिक विधिमंडळातून निवडून गेलेल्यांची बनविली जाणारी घटना समिती खऱ्या

घटना समितीचे कार्य पार पाडण्यास पूर्ण नालायक अशीच असेल.

कारणे--

(१) प्रांतिक विधिमंडळाच्या मतदानाचा हकक मालमत्तेच्या लायकीवर आधारलेला असल्यामुळे शेड्यूल्ड कास्ट्स्‌ व कामगारवर्ग यातील बहुसंख्य लोकांना या विधिमंडळाच्या मतदानाचा हक्क मिळालेला नाही व अशाप्रकारे बहुसंख्यांक जनतेला वगळून केवळ मालमत्ताधारी मतदारांच्या मतांनी निवडलेल्या प्रांतिक विधिमंडळामाफत बनविल्या जाणाऱ्या घटना समितीला राज्यघटना तयार करण्याचा नेतिकदृष्ट्या कोणताही अधिकार पोहोचत नाही.

(२) स्वातंत्र्य किंवा पाकिस्तान या घोषणांवरच जर निवडणुका लढविण्यात आल्या तर अशा घोषणानुसार निवडल्या जाणाऱ्या प्रांतिक विधिमंडळामार्फत बनविण्यात येणाऱ्या घटना समितीला--राज्यघटनेचे स्वरुप व त्यातील मूलभूत प्रश्‍न यावर अधिकृतपणे--अधिकाराने निर्वाळा देता येईल असे मुळीच म्हणता येणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना समितीने बनविलेली घटना ही "लोकांनी लोकांसाठी तयार केलेली घटना' होणेच शक्य नसल्यामुळे तिचा स्वीकार करताच येणार नाही.

(३) संयुक्त मतदार संघ पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीतून निर्माण होणाऱ्या प्रांतिक विधिमंडळातफें बनविल्या जाणाऱ्या घटना समितीत, शेड्यूल्ड कास्द्स्‌ व अशाच इतर जमातींचे खरेखुरे व विश्वासू प्रतिनिधी जाण्याची संभवनीयता नसल्यामुळे, या घटना समितीवर त्यांचा (शेड्यूल्ड कास्ट्स्‌ व तत्सम जमातींचा) विश्वास असणे शक्‍य नाही. म्हणूनच या घटना समितीच्या कोणत्याही निर्णयाला या जमाती नैतिकदृष्ट्या बंधनकारक राहू शकत नाहीत.

प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीशी घटना समितीचा कोणत्याही प्रकारचा संबंध जोडला जाऊ नये अशा प्रकारची खबरदारी घेण्याची आत्यंतिक आवश्यकता असून घटना समितीची निवड निराळया पद्धतीने करण्यात