५४६ डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्याबरोबर सदर पलटणीतील होऊन त्यांना अधिक सवलती देण्यात याव्याच पण
लायक लोकांना हुद्याच्या जागा मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य देण्यात यावे
अशी अस्पृश्य समाजाची अपेक्षा आहे.
ठराव ७ वा--
हिंदी सैन्याचे विसर्जन झाल्यावर बाहेर पडणाऱ्या सैनिकांची पुढील व्यवस्था
पाहाण्यासाठी नेमण्यात आलेल्या (ऑफिसर-इन-चार्ज, रिसेटलमेंट व
रिहॅबिलिटेशन) ऑफिसरच्या पूर्वग्रहदुषित सामाजिक दृष्टिकोनामुळे मोकळ्या
झालेल्या अस्पृश्य सैनिकांचे हितसंबंध डोळ्याआड केले जातील अशी या वर्किंग
कमिटीला भीती वाटते. ही गोष्ट सरकारच्या नजरेला आणून हिंदुस्थान
सरकारला अशी विनंती करण्यात येते की, रिसेटलमेंट व रिहँबिलिटेशन संबंधी
जी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यात अस्पृश्यांना अधिकाराच्या जागासंबंधी
योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्यात यावे.
तिसरा दिवस
गुरुवार ता. ४ ऑक्टोबर १९४५ रोजी सकाळी पुणे येथील विद्यार्थ्याच्या संघटनेतर्फे वर्किंग कमिटीचे सभासद व प्रेस रिपोर्टर्स यांना चहापार्टी देण्यात आली. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली. सदर कॉन्फरन्सचे वेळी अनेक पत्रांचे व वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जनता पत्रातफं अँ, आर. डी. भंडारे, बी. ए. एल. एल.बी. हेही हजर होते. यावेळी ऑ. इं. शे. का. फेडरेशनचे अध्यक्ष रा. ब. एन. शिवराज यांनी आपल्या वर्किंग कमिटीने पास केलेल्या ठरावांचे वृत्त-पत्र प्रतिनिधींपुढे स्पष्टीकरण केले. नंतर बातमीदारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना रा. ब. शिवराज यांनी समर्पक उत्तरे दिली. या प्रेस कॉन्फरन्सला वर्किंग कमिटीचे सभासद हजर होते. त्यांनीही बातमीदारांच्या शंकाकुल प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी प्रेस रिपोर्टर्सना व वर्किंग कमिटीच्या सभासदांना थाटाची पार्टी देण्यात आली.
नंतर दुपारी १२ वाजता पुन्हा वर्किंग कमिटीची बैठक सुरू झाली. या बैठकीसही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. सदर बैठकीत, हिंदुस्थानभर फेडरेशनतर्फे लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीकरिता प्रांतिक पार्लमेंटरी बोर्डस् व या प्रांतिक बोर्डाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता व अखेर निर्णय देण्याकरिता सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड यांची एका ठरावाने स्थापना करण्यात आली व वर्किय कमिटीचे काम संपविण्यात आले.