आणि भाषणे डॉ. बावासाहेव आंवेडकर लेखन ५४८
उमेदवार व निवडणूक याबद्दल त्याला काही माहीत नव्हते. १९३७ च्या
निवडणुकीत अस्पृश्य समाजाने मुंबई असेंब्लीतील १५ पैकी १५ जागा जिकल्या,
उमेदवारांना काँग्रेसने आपल्या दोन जागा जिंकल्या. आपण देखील काँग्रेसच्या सपशेल चीत करून त्यांच्या दोन जागा जिंकल्या, एकूण हिशेब बरोबर झाला. हिशोबाच्या वहीत काँग्रेसला मिळविणीच्या बाजूस श्रीशून्य जमा लिहावे लागले ज्या समाजाला राजकारण ओषधाला माहीत नव्हते, तो समाज १९३७ च्या निवडणुकीच्या पहिल्याच सलामीत संपूर्ण विजयी झाला. ही काही साधी गोष्ट नाही, या समाजाला राजकारण शिकविण्याची काही जरूरी नाही. कारण त्याला कोणीही फसवू शकत नाही. अस्पृश्य समाजास काँग्रेसने आव्हान दिले म्हणूनच हे दोन शब्द मी सांगत आहे.
काँग्रेस आज जवळ जवळ ५०-६० वर्षं राजकारण चालवित आहे. एवढ्या या दीर्घकालात आपण कमविले काय आणि गमविले काय याचा विचार कोणीही व्यवहारी मनुष्य करीत असतों. दरेक वाणी-उदमी प्रत्येक दिवाळीला हिशोब करतो, तसेच या देशाने, प्रत्येक चाणाक्ष माणसाने, काँग्रेसच्या राजकारणाचा आढावा घ्यावा, विशेषतः हिंदू लोकांनी याचा आढावा घ्यावा. ते त्यांचे कर्तव्य- कर्म आहे. ज्या काँग्रेसने मोठमोठी वचने दिली त्याचा हिंदूंनी आढापाढा करावा. हिंदू लोक आढापाढा करतील की नाही हे मला माहित नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपण मात्र याचा जरूर विचार केला पाहिजे.
काँग्रेस ही हिंदुंची संस्था आहे. कारण काँग्रेसला मुसलमान सोडून गेले, खिश्चन वेगळे झाले, पार्शी वेगळे झाले आणि आपण तर वेगळे आहोतच ! आता
काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडून ज्या हिदुंनी स्वार्थत्याग केला त्यांच्या पदरात
काय पडले ? हिंदुंना काही मिळो वा न मिळो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु, ज्याअर्थी हिंदूंनी आम्हाला आव्हान दिले आहे त्याअर्थी आपमतलबी
हिंदू-कांग्रेसबद्दल आपल्यातील ज्या कोणाला आस्था वाटत असेल त्यांनी या
गोष्टीचा अवश्य विचार करावा.
काँग्रेसच्या कार्यांचा आढावा मी देतो म्हणजे हिंदुंच्या डोक्यात थोडा उजेड पडेल. मला जर कोणी विचारले की, काँग्रेसने जे काही मिळविले ते दोन-चार शब्दात तुम्ही सांगू शकाल काय ? तर मी अवश्य सांगू शकेन. मी सांगू शकेन की, कॉंग्रेसने जे काही मिळविले ते म्हणजे “पदोपदी पराजय. सुरवातीपासून त्यांनी ज्या ज्या वेळी सिंहासारखी गर्जना केली त्या त्या वेळी त्यांना दुसऱ्याचे बूट चाटण्याची पाळी आली. काही लोक म्हणत होते की, आमचे पुढारी मवाळ आहेत. गांधी फार तिखट-ते फार जहाल. त्यांनी कायदा मोडावयाचा,