४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 589

आपल्या प्रगतीसाठी देशाला . . . . . झालेच पाहिजे ५४९

जंगले तोडावयाची व तुरुंगात जावयाचे, असे गांधींचे राजकारण. गांधींनी लोकांच्या हाती कोलीत दिले. लोकांनी १९२१ साली एक पोलीस चौकी

जाळली. गांधी फारच घाबरले. त्यांनी तो नाद सोडून दिला. नंतर त्यांनी तो मार्ग सोडून दिला. १९३१ साली गांधी गोलमेज परिषदेला गेले. १९३१ साली गांधी परत आल्यावर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधींना काही करता येईना. तुरुंगात गांधींची एवढी दुर्दशा झाली की, गांधींनी शेवटी आपल्या सुटकेसाठी बिलींगुडनला पत्र लिहिले. परंतु व्हाईसरॉय काही केल्या ऐकेना. गांधींनी पुष्कळ पत्रे लिहिली. पण त्यांचा काही उपयोग होत नाही असे पाहून शेवटी गांधींनी त्यांचा जुना दोस्त जनरल स्मस्ट्स्‌ यांना पत्र लिहून मध्यस्थी घातले. जनरल स्मस्ट्स्‌ मध्यस्थी पडून त्यांनी बिलींगूडनला पत्र लिहिले व अशा तऱहेने गांधींनी नामुष्कीने स्वतःची सुटका करून घेतली.

जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे व उरलेल्यासाठी झगडावयाचे असे टिळक प्रभृतींचे ध्येय होते. गांधींच्या आज्ञेनुसार 'साम्राज्याची अडचण ती आपली संधी' या ध्येयसुत्राचा काँग्रेसने अवलंब केला. १९३९ साली युद्ध सुरू झाले. १९३९, ४०, ४१ साली काँग्रेसने काही केले नाही. १९४२ चे अधे साल काँग्रेसवाले मूग गिळून गप्प बसले व १९४२ ऑगस्टला ठराव केला की, ब्रिटिश सरकार 'चले जाव'. 'चले जाव' म्हणून दरवाजावर प्रत्येक ठिकाणी लिहिण्यात आले. दरवाजावर 'चले जाव' म्हणून भाडेकरूला नोटिस देवून जर भाडेकरू जाऊ लागला तर मग त्याला घालवून देण्यासाठी कोर्टात जाण्याची काही

आवश्यकता भासली नसती. ८ ऑगस्टला १० वाजता ठराव झाला आणि ११ वाजता वारंद्स्‌ काढून काँग्रेस पुढाऱ्यांना तुरुंग दाखविण्यात आला. बाकीचे

जे बाहेर राहिले त्यांनी चळवळ केली, त्यांनी जाळपोळ, लुटालूट, अत्याचार

केले. त्यांनी कोर्ट, कचेऱ्या जाळल्या, रेल्वे रूळ उखडण्यात आले, पोस्टाचे

खांब, तारा वगैरे तोडण्यात आल्या, लाखो रुपयांचे नुकसान करण्यात

आले. पण हे नुकसान झाले कोणाचे ? कोर्ट कचेऱ्या कोणाच्या पैशातून

बांधण्यात आल्या होत्या ? लोकांच्या पैशातूनच ना. रेल्वे रुळ कोणाच्या

पैशातून बांधण्यात आले होते ? लोकांच्या पेशातूनच. हे खरे आहे की नाही ?

मग काँग्रेसने नुकसान केले ते जनतेचे नुकसान केले की ब्रिटिश सरकारचे ?

जे काही नुकसान करण्यात आले त्यापासून इंग्रज माणसाचे काही नुकसान झाले

नाही. जे काही नुकसान झाले ते या देशातील गरीब जनतेचे झाले.

काँग्रेसचे जे लोक तुरुंगात होते त्यांची काय अवस्था होती ? त्यांची तुरुंगात

चांगली बडदास्त होती. जवाहर वगैरे प्रभृतीना अहमदनगरच्या तुरुंगात

ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी दिल्लीहून उत्तम प्रतीचे तांदूळ मागविण्यात