३०-५-१९३७ केवळ निवडणुकीत विजय मिळाल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका - Page 60

१०१

केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने
चळवळीचे कार्य संपले असे समजू नका

“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबई

प्रांतिक लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये निरनिराळ्या जिल्ह्यातील विभागांमध्ये जे

स्पृश्यास्पृश्य उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते त्यापैकी तीन चार

उमेदवारांच्या अपयशाशिवाय बहुतेक सर्व उमेदवार यशस्वी झाले आहेत मुंबई

शहर व उपनगर विभागाच्या निवडणुकीत मोठी चुरस लागलेली होती. या

विभागातर्फे स्वतंत्र मजूर पक्षाचे फक्त दोनच उमेदवार उभे होते. त्यापैकी या

नवीन पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या कसोशीच्या विरोधाशी

धैर्याने टक्कर देऊन विजयी झाले आहेत. याशिवाय विजापूर, नाशिक, पुणे,

सातारा, बेळगाव, अहमदनगर, पूर्व खानदेश, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर वगैरे

ठिकाणचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या पक्षातफ तीन उमेदवार उभे होते. त्यापैकी हे तिघेही उमेदवार निवडून आले आहेत. भाई चित्रे, श्री. शामराव परुळेकर व भाऊसाहेब गडकरी यांच्या विजयामुळे, स्वतंत्र मजूर पक्षाचे बळ वाढले आहे.

यशस्वी उमेदवारांची नावे मिळालेली मते मुंबई इ व एफ वार्ड-

डॉ. बी. आर. आंबेडकर १३,२४५ पुणे पश्‍चिम विभाग-

श्री. आर. आर. भोळे १२,१११ सातारा उत्तर भाग-

श्री. खंडेराव सखाराम सावंत ६,७३६ पुणे पूर्व भाग-

श्री. विनायकराव आ. गडकरी ८,२६७ ठाणे दक्षिण विभाग-

श्री. रामकृष्ण गंगाराम भातनकर ४,२३३ रत्नागिरी उत्तर भाग-

श्री. अनंतराव वि. चित्रे ९,२६८

श्री. गंगाराम रा. घाटगे ५,५२३