४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 591

आपल्या प्रगतीसाठी देशाला .. . . . झालेच पाहिजे ५५१

बहुत ब्रिटिश सरकार विचार करील आणि आपण जर जोरात मागणी केली तर इंग्रज सरकार हा देश सोडून जाईल. काँग्रेस ज्यावेळी स्थापण्यात आली, त्यावेळी तिच्या चालकांना आपल्या सर्वांच्या ऐक्याचे महत्त्व चांगले पटले होते. म्हणून आपणाला आढळून येईल की, काँग्रेसमध्ये सर्व धर्माचे लोक होते. त्यावेळी हिंदू, मुसलमान, खिस्ती, पारसी वगैरे जातीचे लोक काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आपणास आढळून येतात. म्हणून सर्व लोकांना काँग्रेसबद्दल आपुलकी

वाटत होती. |

१९२० पासून काँग्रेसची सूत्रे गांधींच्या हाती गेली. त्यावेळेपासून मौलाना आझादशिवाय काँग्रेसचे सर्व सूत्रधार हिंदू आहेत. वर्किंग कमिटीवर फक्त दोनच मुसलमान आहेत. हा देश आता अशा बिकट परिस्थितीत आहे की, जातीय भेदाला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जातीजातींमध्ये जे भेद होते त्यास राजकारणाची जोड मिळाली आहे. मुसलमान आता केवळ धर्मानेच दूर राहिले नाहीत, आता ते राजकारणात देखील शत्रु झाले आहेत. कारण काँग्रेसने अल्पसंख्यांकांसाठी काही केले नाही. याची जाणीव झाल्यामुळेच मुसलमान भराभर काँग्रेस सोडून जात आहेत. . यावरून कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांच्या पात्रतेची जाणीव होते ! राष्ट्रीय \8६।०7॥]£ मुसलमान आता काँग्रेसमधून फुटून निघून देशाची विभागणी करू पाहात आहेत. काँग्रेसला जन्म देणाऱ्याच्या मनात देशाची शकले करण्याची कल्पना स्वप्नात तरी आली असेल काय ? पण असे हे का झाले ? हे राजकारण वेड्या लोकांचे आहे की शहाण्या लोकांचे आहे ? जातीवादाचा हा भस्मासूर का भेडसावित आहे? हा परिणाम कशाचा ? थोडा विचार केला तर हा परिणाम हिंदुंच्या राजकारणाचा आहे हे चांगले दिसून येईल. मुंबईला जी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झाली तिच्याकडे पाहिले तर हिंदुंच्या राजकारणाचे मला आश्चर्य वाटते.

मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करून घ्यावयाची असेल तर या देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे. आपण या शस्त्राची पूजा करावयास पाहिजे, म्हणजे या शस्त्राचा उपयोग आपणास आपल्या