पुपर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे |
शत्रूवर करता येईल. हे शस्त्र मिळविणे आगामी निवडणुकीवर अवलंबून
आहे. म्हणून भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम
आहे. या निवडणुकीवर आपल्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न अवलंबून
आहे. या जीवन मरणाच्या दारूण संग्रामात आपण विजयी-यशस्वी झालेच
पाहिजे. हा लढा जिंकण्यासाठी आपण जय्यत तयारी केली पाहिजे. या
जय्यत तयारीस आपण आतापासूनच लागले पाहिजे.
सध्या हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहण्यासाठी एकदर १५ मंत्री आहेत.
मीही त्या १५ पैकी एक आहे. हे आपणाला माहीत आहेना? मी
व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये फक्त दोनच वर्षे आहे. परंतु या दोन वर्षात
मी आपणासाठी काय केले ? अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी जी
कधीही आपल्यावर घेतली नव्हती ती मध्यवर्ती सरकारने घेतली. बनारस हिंदू `
युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी हिंदुस्थान सरकारने २० लाख रुपये दिले. आता देखील त्या युनिव्हर्सिटीचे जवळ जवळ ४१ हजार रुपयाचे बील सरकारजवळ येऊन पडले आहे. अलिगड युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी मुसलमानांना '० लाख रुपये देण्यात आले होते आणि प्रत्येक वर्षी ३ लाख रुपये अलिगड युनिव्हर्सिटीसाठी मध्यवर्ती सरकार देत असते. अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे याची कल्पना सरकारला स्वप्नात देखील झाली नाही. मी गेल्यानंतर अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी ३ लाख रुपये मंजूर करून घेतले. या तीनं लाख रुपयांमधून प्रत्येक वर्षी ३०० विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. यावेळी ३० विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षाला १५ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जावू शकतील. आपल्यापैकी असा कोणी विलायतेला गेला आहे काय ? साहेबाचा बुटलेर म्हणून कोणी कदाचित गेला असेल. यावेळी जाणाऱ्या ३० विद्यार्थ्यामध्ये एक भंगी, एक मांग आणि किती तरी चांभार आहेत. मला हेच सांगावयाचे आहे की, या योजनेचा फायदा अस्पृश्यांतील प्रत्येक जातीला करून घेता येईल.
प्रॉव्हीन्शियल सर्व्हिसेसमध्ये आणि सेन्ट्रल सर्व्हिसेसमध्ये २५ टक्के मुसलमानांसाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खिश्चन, शिख व अँग्लो इंडियन यांच्यासाठी ठराविक नोकऱ्याचे प्रमाण राखून ठेवण्यात आले आहे. परंतु अस्पृश्य समाजाकडे कोणी लक्ष दिले आहे का ? आपल्यासाठी काही सोय करण्यात आली होती काय ? आपणाला एक तुकडा देखील दिला गेला नव्हता. मी मात्र तशी सोय करून घेतली आहे. अस्पुश्य समाजासाठी