आपल्या प्रगतीसाठी देशाला . . . . . झालेच पाहिजे ५५३
शेकडा आठ पूर्णांक एक तृतीआंश इतके प्रमाण नोकऱ्यांमध्ये राखून ठेवले आहे. मी गेल्यापासून आपले पुष्कळ लोक मोठ्या हुद्यावर चढले आहेत. आपल्यापैकी एक डेप्युटी सेक्रेटरी टू दी गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया आहे. दुसरा एक अन्डर सेक्रेटरी आहे. तीन एक्झीक्युटिव्ह इंजिनियर आहेत. सिमल्याला माझ्या डिपार्टमेन्टचा एक भाग आहे तेथे एकंदर २८ क्लार्क
आहेत. त्यापैकी १८ भंगी आहेत.
राजकीय सत्तेच्या जोरावर मनुष्य काय करू शकतो याचे हे एक चांगले उदाहरण आहे. मी हे माझा बडेजाव अगर गौरव करण्यासाठी सांगत नाही. तर आपल्या हाती राजकीय सत्ता आली तर आपण काय करू शकू हे दाखविण्यासाठीच मी हे सांगत आहे. माझ्या जोडीला आणखी एखादा आपल्यापैकी मंत्री असता तर आम्ही दोघांनी पुष्कळच केले असते. मी जर प्रत्येक डिपार्टमेन्टमध्ये फक्त पाच पाच वर्षे राहिलो तर आपल्या लोकांचे पुष्कळ कल्याण करता येईल. राजकीय सत्तेशिवाय आपणास काही करता येणार नाही म्हणून आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे. Politics should be the life-blood ofthe Scheduled Castes. आपला जो नाश झाला आहे, आपण आज हजारो वर्षे खितपत पडलो आहो त्याचे कारण आपणास राजकीय सत्ता नव्हती. ही सत्ता आपण मिळविली पाहिजे. राजकीय सत्ता ही एक अजब शक्ती आहे, तिचा उपयोग आपण
आपल्या शत्रुवर केला पाहिजे.
निवडणुकीसाठी एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्यात आला आहे. या पार्लमेंटरी बोर्डावर पाच माणसे राहतील. त्यांनी उमेदवार निवडावयाचे आहेत. त्या बोर्डाला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमाप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यात येतील. आपण अशाच उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. ज्याला वाटत असेल की, असेंब्लीमध्ये तो एकटाच वाटेल ते करू शकेल, तर तो त्याचा मुर्खपणा आहे. जे काही करू शकेल तर तो पक्षच करू शकेल. गेल्यावेळी काँग्रेसला फक्त स्वतंत्र मजूर पक्षाचे भय होते.
कारण त्यांना माहित होते की, हजारो रुपये जरी दिले तरी आपला सभासद
ते घेणार नाही.
पार्लमेंटरी बोर्ड जे काही करील आणि जी माणसे निवडली जातील त्याच
माणसाला आपण निवडले पाहिजे. तुम्ही सर्वानी शपथ घेतली पाहिजे की,
आपण ही निवडणूक जिकूच म्हणून.