४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 595

आपल्या प्रगतीसाठी देशाला . . . . . झालेच पाहिजे ५५५

या तिनही दिवशी स्थानिक फेडरेशनतर्फे व कार्यकर्त्यांतर्फे ने. ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्किंग कमिटीचे सभासद यांची उत्तम प्रकारची व्यवस्था ठेवली गेली होती.

शे. का, फेडरेशनच्या या वर्किंग कमिटीच्या बैठकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल मार्गदर्शिकत्वाखाली अस्पृश्य समाजाचे राजकारण उंच पातळीवर नेऊन ठेवले आहे, यात कसलीही शंका नाही.

वर्किंग कमिटीने केलेल्या मार्गदर्शनाने, अस्पृश्य वर्ग, आपल्या पोलादी संघटनेने, येत्या निवडणुकीत प्रतिपक्षांचा धुव्वा उडवून संपूर्णपणे यशस्वी होणारच होणार ही सर्वांची खात्री झालेली आहे.

अशाप्रकारे सर्व कार्य आटोपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ता. ४-१०-४५ रोजी रात्रीच्या गाडीने मुंबईस रवाना झाले. रा. ब. शिवराज मद्रासकडे व वर्किंग कमिटीचे इतर सभासद आपापल्या प्रांताकडे रवाना झाले.

शे. का. फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची ही बैठक हिंदी राजकारणाच्या इतिहासात जशी महत्त्वाची ठरेल त्याचप्रमाणे पुणेकर अस्पृश्यांच्या चिरंतन स्मरणात राहील यात कसलीच शंका नाही.