मजुरांच्या सुधारणेसाठी . . ... विरोध करू नये ५५७
युद्धकार्यासाठी जे कर उभारण्यात आले त्यांचा विनियोग सार्वजनिक हितासाठी करण्यात आला असता तर त्यातून किती निराश्रित लोकांना जागा देता आली असती, किती अर्धनग्रांना कपडे देता आले असते, किती भूकेल्या स्त्री-पुरुषांना अन्न देता आले असते, किती निरक्षरांना साक्षर करता आले असते आणि किती रोग्यांना निरोगी करता आले असते असे प्रश्न कामगार सर्व मुत्सद्यांना विचारू शकेल.