३०-११-१९४५ मला केवळ स्वराज्य नको तर संपूर्ण स्वराज्य हवे - Page 598

२२४
मला केवळ स्वराज्य नको तर

संपूर्ण स्वराज्य हवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या

अधिवेशनाला हजर राहाण्यासाठी अहमदाबाद येथे शुक्रवार, तारीख ३० नोव्हेंबर

१९४५ रोजी सकाळी आले. आगाऊ ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी दुपारी

त्यांना अहमदाबाद म्युनिसीपालिटीतर्फे म्यु. गांधी हॉलमध्ये मानपत्र देण्यात

आले. ते येणेप्रमाणे-

अहमदाबाद म्युनिसीपालिटीने डॉ. बाबासाहेबांना दिलेले मानपत्र

डॉ. बी. आर. आंबेडकर, एम्‌. ए., पीएच्‌. डी., डी. एससी.,

बार-अंट-लॉ, यांस,

आमच्या या ऐतिहासिक शहरी, अहमदाबादला, आज आपले पाय लागले

आहेत हे आम्ही आमचे सद्भाग्य समजून आम्ही आपले हार्दिक स्वागत

करतो. देशातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी आपण एक आहात. सहा कोटी

अस्पृश्यांच्या अंतःकरणातील आपले स्थान अढळ आहे. खोल गर्तेत रुतलेल्या व॒ पायदळी तुडविले गेलेल्यांच्या उद्धारासाठी स्वतःचे आयुष्य वाहून

हिन्दुस्थानातील एका महत्त्वाच्या घटकाचे पुढारीपण आपण जिंकले आहे.

जे लोक अस्पृश्यांच्या सावलीचाही विशाद मानीत असत अशा लोकांच्या हातात सर्व शैक्षणिक संस्था असताही आपण या परिस्थितीतही सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देऊन असामान्य असे शिक्षण संपादन केलेत. कोट्यावधी अस्पृश्यांना शतकानुशतके हीन-दीन-परिस्थितीत सक्तीने डांबून ठेवणाऱ्या निंद्य-बुरसटलेल्या विचारसरणीवर प्रखर प्रहार करून अस्पृश्योद्धाराचे दरवाजे सताड उघडे करण्याचे अत्यंत बिकट असे कार्य आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर अचाट धीरोदात्ततेने आपणच करू शकलात. आपल्या भगिरथ प्रयत्नाने अस्पृश्य समाजाची शैक्षणिक व इतर प्रगती करून, सामाजिक समता व लोकशाही प्रस्थापित करण्यात आपण पुष्कळच कार्य केलेत आपल्या देशातील सामाजिक समतेच्या चळवळीचे आपणच खरे दिग्दर्शक आहात.

या देशातील चाळीस कोटी लोकांचे हितसंबंध गोविल्या गेलेल्या हिंदी जनतेचे मवितव्य ठरविणारी हिंदुस्थानची भावी घटना तयार करताना सहा कोटी अस्पृश्य जनतेचा विचार केला जावून त्यांच्या संमतीशिवाय ही घटना अस्तित्वात येऊ जनता : १ आणि ८ डिसेंबर १९४५.

|