३०-११-१९४५ मला केवळ स्वराज्य नको तर संपूर्ण स्वराज्य हवे - Page 599

मला केवळ स्वराज्य नको तर संपूर्ण स्वराज्य हवे ५५९

शकणार नाही असे सरकारला जाहीर करणे भाग पडले त्याचे कारण आपल्या मार्गदर्शनाखालील अस्पृश्यांच्या चळवळीचे अचाट सामर्थ्य सरकारने पुरते जाणले आहे. हिंदी राजकारणात अस्पृश्यांना प्राप्त झालेल्या या महत्त्वाच्या नि मानाच्या स्थानाचे यश केवळ आपल्यालाच आहे.

हिंदभूच्या मोजक्या सुपुत्रांपैकी, उच्च विचारसरणी, प्रभावी लेखन, बिनतोड नेतृत्व या आपल्या विविध अशा अमूल्य गुणांमुळे हा हिंद देश आपल्याबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगीत आहे.

बहुसंख्यांकांच्या जुलमी पकडीतून, असहाय्य अशा अल्पसंख्यांकांची, विधायक सूचना करून राजकारणाच्या दीर्घ व्यासंगामुळे अचूक मार्गदर्शन आणि राजकारणातील कोंडी फोडण्याचे सामर्थ्य व प्रस्थापित करण्याची तळमळ यांच्या जोरावर आपण सोडवणूक केलीत. थोडक्यात ' आपण अस्पृश्यांचे उद्धारक आहात ' आम्ही दुर्दैवी हिंदवासीयांना प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण चिरायु व्हावेत हीच आमची इच्छा आहे.

आम्ही,

चेअरमन, व्हाइस चेअरमन

आणि म्युनिसीपल कमिटीचे '

अहमदाबाद, ३०-११-४५. सभासद, अहमदाबाद.

सदर मानपत्राला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबडेकर म्हणाले ,

“ मी राहात असलेल्या मुंबई शहराच्या म्युनिसीपालिटीने मला मानपत्र देण्यासंबंधीचा ठराव विचारात घेण्याचेही नाकारले, त्याबद्दल मी त्या

म्युनिसीपालिटीला मुळीच दोष देत नाही, कारण माझ्या सेवेचे चीज केले जावे या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात कधीच महत्त्व दिलेले नाही. परंतु तुमच्या म्युनिसीपालिटीने दिलेली ही वागणूक व मी ज्या शहरी राहातो त्या म्युनिसीपालिटीची वागणूक यातील फरक मात्र लक्षात घेण्याजोगा आहे.

या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था याबद्दल मुळीच आस्था दाखविण्यात येत

नाही. १९४२ च्या चळवळीच्यावेळी राज्यकारभाराचा गाडा हाकण्यात किंबहुना

देशात शांतता राखण्यासाठी ज्यांनी मदत केली ते काही भावनाप्रधान लोकांना

आवडले नाही. परंतु १९४२ च्या चळवळीमध्ये कायद्याला मान देऊन ज्यांनी

सुव्यवस्था राखली त्यांचे ते करणे योग्य होते इतकेच नव्हे तर त्यांनी त्याप्रकारे

वागून देशाचे हितच केले हे कबूल करणे जरूर आहे.