३०-११-१९४५ मला केवळ स्वराज्य नको तर संपूर्ण स्वराज्य हवे - Page 600

५६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बिघाड होऊन कायदा व सुव्यवस्थेला धोका उत्पन्न देशातील राजकारणात

प्रयत्न करणे राजकारणी झाल्यास देशातील अराजकतेचे निर्मूलन करण्यासाठी

नाही तर राजकारणात पुरुषांचे कर्तव्य ठरते. ते कर्तव्य जर त्यांनी केले

वावरण्यास ते नालायक ठरतात. १९४२ च्या ऑगस्ट चळवळीनंतर देशात जी अराजकता माजली त्यावेळी देशात सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य केले नसते तर जपान किंवा जर्मनी यांच्याकडून हिंदुस्थानची दुर्दशा झाली असती. हिंदुस्थानला या दुर्दशेपासून आम्ही वाचविले ही देशसेवा नव्हे

काय ?

देशाला स्वराज्य नको असे कोणीतरी, कधीतरी म्हणू शकेल काय ? मला संपूर्ण स्वराज्य हवे. काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात कधीही निर्माण झाली नव्हती अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांवरचा मुसलमानांचा विश्वास अजिबात उडाला

आहे. सहा कोटी अस्पृश्यांचा काँग्रेसवर तर विश्वासच नाही. काँग्रेसचे पुढारी जर मुत्सद्देगिरीने वागले असते तर हे असे झाले नसते. बहुसंख्य हिंदुनी

या गोष्टीचा जरूर विचार करावा.

स्वराज्य आपल्या दृष्टीपथात आहे. ब्रिटिश सरकार आता फार काळ राहू शकणार नाही. परंतु त्याला आजच आपण घालवूही शकत नाही याचे कारण हे की आपल्यामध्ये (हिंटी लोकात) एकी नाही. आज ज्या ठिकाणी माझा सन्मान होत आहे तो कॉँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे मला ठाऊक असताही मी माझी मते स्पष्टपणे बोलून दाखविली याचे कारण हेच आहे की, ही माझी मते काँग्रेसच्या

हायकमांडपर्यंत पोहोचली जावीत