केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने . . . . - असे समजू नका २३
दक्षिण भाग- रत्नागिरी
७,५८९ श्री. शामराव विष्णु परुळेकर
अहमदनगर दक्षिण भाग-
८,९८५ श्री. प्रभाकर जनार्दन रोहम
सोलापूर उत्तर भाग- |
७,६६२ श्री. जिवाप्पा सुभान ऐदाळे
पूर्व खानदेश पूर्व भाग-
९,५१९ श्री. दौलतराव गुलाजी जाधव
नाशिक पश्चिम भाग- |
श्री. भाऊराव कृष्णराव गायकवाड १६,६०५
बेळगाव उत्तर भाग- |
श्री. बळवंत हनुमंत वराळे २१,३२२
ठाणे जिल्हा उत्तर विभाग-
श्री. दत्तात्रय वामन राऊत
१०,१२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी उभे केलेले अस्पृश्य वर्गीय उमेदवार आणि
इतर स्पृश्य उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून काँग्रेसादी पक्षांनी जितके विरोधी
वातावरण निर्माण करता येईल तितके शिकस्तीचे प्रयत्न पैशाच्या बळावर
केले. डॉ. बाबासाहेबांविषयी खोडसाळपणाच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांच्या
उज्ज्वल चारित्र्याला काळिमा लाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु या सर्व
प्रकारच्या विरोधी परिस्थितीला टक्कर देऊन डॉक्टरसाहेब विजयी झाले ही गोष्ट
अपूर्व नाही असे कोण म्हणेल ?
स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने कायदेमंडळाच्या निवडणुकीत यशस्वी
झालेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यासाठी पक्षाच्या विद्यमाने रविवार
ता. ३० मे १९३७ रोजी संध्याकाळी परळ येथील कामगार मैदानावर
डॉ. पी. जे. सोळंकी, जे. पी. यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती.
कायदेमंडळाचे प्रतिनिधी आणि निमंत्रित सन्माननीय पाहुणे यांना
बसण्यासाठी उच्चासनावर गादीच्या खुर्च्या व मखमलीची कोचे ठेवण्यात आली
होती. मैदानात लॉऊडस्पीकर लावण्यात आले होते. ठिकठिकाणी किटसन्
लाईट लावले होते. सभेला १५ हजारावर लोकसमुदाय जमला अखून हजार
बाराशे स्त्रिया होत्या.
१ जनता : २७ फेब्रुवारी १९३७.