२२५
निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता
हस्तगत करता येईल
गुजरातेतील इतिहास प्रसिद्ध अहमदाबाद शहरी गांधी-वल्लभांच्या राज्यात-साबरमतीच्या विस्तीर्ण तिरावर लाल दरवाजानजिक उभारलेल्या
भव्य बुद्धनगरात दिनांक २९ व ३० नोव्हेंबर १९४५ रोजी मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे प्रथम अधिवेशन अत्यंत उत्साहाने यशस्वीरित्या पार पडले. भारतीय अस्पृश्यांचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक ३० रोजी या इतिहासप्रसिद्ध अधिवेशनास खास उपस्थित होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अहमदाबादेच्या सर्व कामगारांनी गिरण्या बंद पाडून त्यांचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले, ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद व भूषणावह म्हणून उल्लेखनीय होय. पहाटे ५ वाजेपासून अहमदाबाद स्टेशनवर हजारो लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमला होता. समता सैनिक दलाचे लढाऊ सैनिक या प्रचंड समुदायात शांतता व व्यवस्था राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. अनेक संस्थांच्या व व्यर्कितिच्यातर्फ पुष्पहार घालून, त्यांचे स्वागत करण्यात आले. ' डॉ. आंबेडकर जिंदाबाद ' ' आंबेडकर कौन है दलितोंका देव है, ' ' दलित फेडरेशनचा विजय असो ' ' अलग मताधिकार हासील करो ' या गगनभेदी घोषणांनी अहमदाबादचे सारे वातावरण दुमदुमून गेले होते. स्टेशनवर त्यांच्या खास सलूनमध्ये कम्युनिस्ट पार्टी, रॉयीस्ट पार्टी, हिंदू महासभा आदि पक्षांच्या पुढाऱ्यांनी आणि अनेक प्रमुख व्यकितनी त्यांच्या मुलाखती घेतल्यावर सत्कार केला. अहमदाबाद शहराचे वातावरण त्यांच्या आगमनाने अत्यंत उत्साहपूर्ण झालेले दिसत होते. आश्चर्याची नव्हे अभिमानाची गोष्ट ही की, याच दिवशी अहमदाबादेला. मुंबईच्या गव्हर्नर साहेबांचे आगमन झाले. लोकांच्या प्रचंड समुदायात एक खादीधारी देशभक्त मान उंचावून डोकावत होता. गर्दीतून मोठ्या मुष्कीलीने धडपडत आलेला एक किसान चौकशी करू लागला. गांधी टोपीवाल्याने जबाब दिला, ' गव्हर्नर साब आवे छे ' । माझ्या शेजारी उभा असलेला दूरच्या खेड्यातील एक अस्पृश्य तरुण गांधी भक्ताचा धिक्कार करून उत्तरला. ' बापडा कोई अंधाने गूंगा पण जाणे छे के बाबा आंबेडकर आवेला छे”, त्याच्या या तिखट उत्तराने शरमिंदा होऊन त्या बनियाने हळूच तेथून पाय काढला. प्रांताध्यक्ष श्री. गासकवाड आणि
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. राजभोज यांनी
जनता : ८ डिसेंबर १९४५.