३०-११-१९४५ निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल - Page 602

५६२ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

दर्शनोत्सुक जनसमुदायास शांततेने परिषदेच्या स्थळी हजर राहण्याची व आपल्या पुढाऱ्याचा संदेश ऐकण्यासाठी प्रचंड संख्येत जमा होण्याची विनंती केल्यावर सर्व लोक शांततेने घरोघर निघून गेले. रात्री जागरण झाले असताही अनेक कार्यक्रम विश्रांती न घेता बाबासाहेबांनी पार पाडले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले होते. परंतु वेळेच्या अभावी काही कार्यक्रम साहजिकच रद्द करावे लागले. दुपारी रखिया रोडवरील कामगारांच्या चाळीत भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जेवणाचा बेत डॉ. बाबासाहेबांच्या आग्रहावरून डाळ-भात-भाजी असा अगदी साधा होता. त्यांच्या समवेत फेडरेशनचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. भोजनोत्तर गुजरातमधील प्रचलित परिस्थितीसंबंधी अनेक कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडले. शेवटी अत्यंत साध्या सोप्या गुजराती भाषेत बाबासाहेबांनी फेडरेशनच्या कार्यासंबंधी व आगामी निवडणुकीसंबंधी बहुमोल अशा विधायक सूचना केल्यानंतर तेथून लगेच ते अहमदाबाद म्युनिसीपालिटीच्या मानपत्र समारंभास गेले. हा समारंभ आटोपून लगेच ते परिषदेसाठी खास उभारलेल्या बुद्ध नगरात प्रविष्ट झाले. त्यांच्या आगमनापूर्वी अनेक गुजराती कवींनी व शाहिरांनी समाज क्रांतीपर गाणी गाऊन श्रोत्यात उत्साह निर्माण केला. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाबरोबर जयघोष करून लोकांनी सारे वातावरण दणाणून सोडले. स्वागताध्यक्ष श्री. पी. एम. पटनी यांच्या भाषणानंतर टाळ्यांच्या प्रचंड गजरात व जयघोषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करण्यास उभे राहिले. ध्वनीक्षेपकांची व्यवस्था केलेली असल्यामुळे बुद्ध नगराच्या विस्तीर्ण जनसमुदायाने त्यांचे ओजस्वी भाषण अत्यंत शांतपणे आणि भक्तिभावाने श्रवण केले.

डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

बंधुंनो आणि भगिनींनो

अध्यक्षांनी मला गुजरातीत बोलण्याची विनंती केली आहे. हिंदीत बोलणे मला चांगले जमले असते. गुजरातीत मी बोलू शकतो पण हल्ली तिचा थोडासा विसर पडला आहे. तरीपण मी गुजरातीत बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. आजचा हा प्रचंड जनसमुदाय पाहून मला १९२६ सालची आठवण होते. त्यावेळी मी या शहरात अस्पृश्य विद्यार्थ्याच्या बोर्डिंगच्या कामकाजासाठी आलो होतो. मला जाणणाऱ्या येथील काही सद्गृहस्थांनी माझी भेट घेऊन, मला ' इथे एखादी सभा करून जा ' अशी विनंती केली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, ' हे शहर तर काँग्रेसचे माहेरघर आहे. येथील लोक काँग्रेसवादी तर मी काँग्रेसविरोधी म्हणून प्रसिद्ध !' परंतु मंडळींचा अतिशय आग्रह पाहून मी