३०-११-१९४५ निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल - Page 603

निवडणुकीच्या माध्यमातूनच . . . . हस्तगत करता येईल ५६३

सभेला हजर राहून बोलण्याची संमती दिली. ही सभा येथील एका प्रशस्त

हॉलमध्ये भरली होती व सभेच्या अध्यक्षस्थानी आपल्यातीलच एका जुन्या कार्यकर्त्याची योजना करण्यात आली होती. या सभेत मी माझ्या अनुभवाप्रमाणे बोललो. अध्यक्षांनी आपल्या भाषणात मला समज दिली की, ' आम्ही लोक सर्व गांधींचे प्रजाजन आहोत. आम्ही गांधीला सोडू शकत नाही. तुम्ही तसा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम वाईट होईल. ' हे उद्गार मला चांगले आठवतात व त्या सभेला हजर असलेल्या आपल्यापैकी कुणीही सद्गृहस्थ [हे ] [सत्य ] [असल्याचे ] सांगू शकेल. वीस वर्षापूर्वीचा हा अनुभव आणि आज येथे जमलेला [प्रचंड ] समुदाय पाहून मला वाटते की, [' ] सत्य [कधीही ] [लोपत ] [नाही, ] [ते ] [कधीतरी ] [प्रगट ] होतेच होते. ' आज १९४५ साली काँग्रेसचे [केंद्र ] असलेल्या [या ] [अहमदाबाद ] शहरात अस्पृश्य लोक काँग्रेसविरोधी सामना [करण्यास ] [सिद्ध ] [झाले ] [आहेत. ] हेच ते सत्य होय (टाळ्या). आज मी येत्या निवडणुकासंबंधी बोलणार [आहे. ] कोणावर टीका करण्याचा माझा [उद्देश ] [नाही. ] परंतु गेल्या वीस वर्षातील गांधींचे ' कुटील राजकारण आणि अस्पृश्य [विरोधी ] [कारस्थानांचा ] [इतिहास ] [सांगितल्याखेरीज ] गत्यंतर नाही आणि त्याशिवाय [माझ्या ] [म्हणण्याचा ] [मतितार्थ ] [आपल्या ] [ध्यानात ] येणार नाही आणि म्हणून मला जे [काही ] [सांगायचे ] [आहे ] [ते ] [कडवट ] [असले ] [तरी ] कटु सत्य असल्याचे आपल्या [ध्यानात ] [येईल. ]

गांधी अस्पृश्यांचे उद्धारकर्ते आहेत असे बोलले जाते. मी गेली वीस वर्षे याच गोष्टीचा विचार करीत आहे की, गांधी अस्पृश्यांचा उद्धार कसा करणार ? त्यांची खरोखरच तशी इच्छा आहे काय? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. राउन्ड टेबल परिषदेला आम्ही गेलों, तेव्हा गांधींनी ' अस्पृश्योद्धार होईल तो राजकीय प्रगतीने नव्हे तर सामाजिक सुधारणाद्वाराच होईल, ' अशी घोषणा केली होती. गांधींच्या दृष्टीने ते कितपत खरे आहे हे त्यांचे तेच जाणोत. परंतु राजकीय हक्काखेरीज उन्नती अशक्य आहे असे माझे ठाम मत आहे. (टाळ्या). १९१९ साली गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९२० साली असहकारितेची चळवळ केली. बार्डोलीच्या सत्याग्रहात लाखो रुपये जमवून, इंग्रजांना या देशातून हाकलून देण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याशिवाय आणि अस्पृश्यता व जातीभेद नष्ट झाल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असे जाहीर केले होते. पण जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी त्यांनी काय केले ? अस्पृश्यता निवारण्यासाठी एक मामुली कमिटी नेमून अस्पृश्यांचा उद्धार करण्याचे गांधी व काँग्रेसने ठरविले, पण त्यासाठी काही न करिता या कमिटीने अपुरे काम सोडून दिले आणि ते हिंदुमहासभेकडे सोपविले. इतर कामी लाखो रुपयांचा खर्च केला. पण अस्पृश्यांसाठी ३० हजार रुपयेच खर्च केले. इतके हे कार्य त्यांच्या दृष्टीने