३०-११-१९४५ निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल - Page 604

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५६४

अँड गांधी प्रसिद्ध झालेल्या ' व्हॉट काँग्रेस महत्त्वाचे वाटले ! माझ्या नुकत्याच

हॅव डन टू दी अनटचेबल्स “ (What Congress and Gandhi have done io .

ते १९३२ the 0098065) ग्रंथात मी हे सर्व साधार स्पष्ट केले आहे. १९२० पर्यंत अस्पृश्यता निवारणाच्या वल्गना करण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. १९३२ साली पुना करार झाला. त्यावेळी अस्पृश्यांच्या स्वतंत्र राजकीय हक्कांविरूद्ध गांधी आणि काँग्रेसने माझ्याशी झगडा केला. हिंदूंपासून अस्पृश्य वर्ग वेगळा झाल्याने, हिंदू निर्बल होवू नयेत म्हणून गांधींनी येरवड्याच्या तुरुंगात प्राणांतिक उपोषण केले आणि या प्रसंगी घडून आलेल्या करारातूनच हरिजन सेवक संघ जन्माला आला. तेव्हापासून आज तेरा वर्षात या संघाने अस्पृश्यांसाठी काय केले ? हा माझा जाहीर सवाल आहे. तुमच्या शिक्षणासाठी त्याने कोणते मोठे कार्य केले ! आमच्या हाती सत्ता असेल तर आम्ही काय करू शकतो याचे उदाहरण म्हणून गेल्या तीन वर्षातील माझी कामगिरी तुम्हा पुढे आहेच ! या तीन वर्षात मी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी तीन लाख रुपये मिळविले. आता पाच लाख रुपये मिळतील. पाचशे विद्यार्थी आज कॉलेज शिक्षण घेत असून तीस विद्यार्थी विलायतेत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. तुलना करा आणि ध्यानी आणा, हे कार्य गांधीने वा काँग्रेसने केले नाही. हरिजन सेवक संघाच्या कार्याने आमचा कसा काय उद्धार होईल हेच मला काही कळत नाही ! तीन-चार रुपड्याच्या शिष्यवृत्त्या आणि

मंदीरे खुली करणे या तुटपुंज्या गोष्टींचा काय गाजावाजा ! आम्ही अस्पृश्यांना

मंदीरे खुली केली असे दाखविले जाते. पण त्याचा परिणाम काय

झाला. स्वाभिमानी अस्पृश्य तर या मंदिरांकडे ढुंकूनही पाहात

नाहीत ! त्रावणकोर सोडून इतर ठिकाणी कोणती मंदीरे खुली केली ? ज्यात ' कुत्रो अने गधेडो ' जातात अशीच मंदिरे खुली केली ?

(हंशा) ज्या सामाजिक सुधारणेचा हे लोक डांगोरा पिटतात त्याची ही तऱ्हा.

आता राजकारण पहा. १९३२ साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये

मुसलमान-खिश्चन वगैरे अल्पसंख्यांकांप्रमाणेच अस्पृश्यांना देखील राजकीय हक्क मिळालेच पाहिजेत म्हणून मी जोरदार लढा केला आणि आज काही मूर्ख

आणि बदमाष लोक जनतेत असा खोटा प्रचार करतात की, हे राजकीय हक्क

गांधींनी मिळविलेत. पणते साफ खोटे आहे. अस्पृश्यांना सुईच्या अग्राइतकेही राजकीय हक्क मिळू नयेत म्हणून मुसलमानांशी गुप्त संधान बांधणाऱ्या

गांधींनी ते मिळविले नसून मी मिळविले आहेत. (टाळ्या). जातीय निर्णयाने आपणाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला होता. त्यामुळे आपण आपला योग्य प्रतिनिधी निवडून देवू शकलो असतोच, पण आपणास त्याखेरीज मिळालेला सार्वत्रिक मताधिकारही गाजवू शकलो असतो. पण गांधींनी प्रायोपवेषनाची

धमकी दिली. त्यापूर्वी 'आंबेडकर कोण झाडाचा पाला आहे' असे म्हणणारे |