निवडणुकीच्या माध्यमातूनच . . . . हस्तगत करता येईल ५६५
काँग्रेसजन घाबरले व म्हणू लागले 'आंबेडकर कूपा करा आणि गांधी मरतो आहे त्याला वाचवा.' पण माझ्यापुढे गांधींच्या जिवापेक्षाही दहा कोटी अस्पृश्यांच्या कल्याणाचा श्रेष्ठ प्रश्न होता. गांधी काकूळतीस आला आणि म्हणाला 'आंबेडकर माझा जीव तुमच्या हाती आहे.' त्यासाठी मी पुना करार केला. पण गांधीने काय केले. उपकार जाणणे दूरच राहिले. पण गांधीने कृतघ्नपणा केला. अस्पृश्यांचा गळा कापला. तुमच्या राजकीय हक्काला विरोध करणार नाही या वचनाला हरताळ फासून [काँग्रेसने ] [आमच्या ] [उमेदवारांना ] विरोधक म्हणून स्वार्थी व नालायक लोक उभे [केले. ] विचार करा. हे काय झाले. हे मी कशासाठी मिळविले ?
दरेक गावात एकही दिवस असा जात नाही की, आपल्यावर अत्याचार होत नाहीत ! येथील एका नजीकच्या गावची हकीकत ऐकून तुम्हाला भयंकर संताप वाटेल. तेथल्या अस्पृश्य लोकांवर सामाजिक बहिष्कार पुकारला. सतत एकवीस दिवस त्यांना नाही नाही त्या प्रकारे छळल्यानंतर स्पृश्य हिंदुनी त्यांना धमकी दिली की, तुम्ही 'मेलेला पार्डा उचललाच पाहिजे' नाहीतर त्याबद्दल तुम्ही ५० रुपये दंड द्या. वेठ करून रस्ता दुरुस्त करा. नाहीतर तुम्हाला येथे राहणे मुष्कील करू. दुसरे कविठा गावचे उदाहरण. त्यांच्या झोपड्या उठविल्या. पाण्यात घासलेट टाकले. असे अनेक प्रकारे तेथल्या अस्पृश्य लोकांना छळिले. तेथल्या लोकांनी गांधींकडे आपली गाऱ्हाणी पाठविली. पण गांधीने काय केले. त्यांना गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. (शेम-शेम) जुलूम करणारांना शिक्षा करा किंवा त्यांच्यावर कायदेशीर इलाज करा. असा सल्ला गांधीने दिला नाही. ही गांधींची नीती. कायदे मंडळाच्या जागांवर आमचे उमेदवार पाठविण्याचा हेतू, आम्हावर होणारा जोरजुलूम नाहिसा करणे होय. आमचा उमेदवार तेथे जावून आमची गाऱ्हाणी मांडील. आम्हावरच्या जुलूमाची दाद मागेल. आमच्या हितासाठी सतत झगडेल. कायदे मंडळाच्या निवडणुका लढविणे हाच आमचा अंतिम हेतू आहे. काँग्रेस तिकीटावर निवडून आलेल्या हरीजन उमेदवारांना विचारा. दोन वर्षे सात महिन्याच्या तुमच्या कारकिर्दीत तुम्ही अस्पृश्यांसाठी काय केले ? त्यांनी एकतरी सवाल विचारला आहे काय ? तुमच्या हिताचा एकतरी ठराव केला आहे काय? तर मग ते तिथे कशाला गेले? व्हॉइसरॉयच्या नव्या घोषणेप्रमाणे मध्यवर्ती सरकारात अस्पृश्यांचा प्रतिनिधी घेण्याचे जाहीर केले गेले. पण गांधीने तुमच्याविरूद्ध तक्रार केली. तुमचा प्रतिनिधी म्हणजे मला तेथून काढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न आजही चालू आहे. काँग्रेसच्या मागे लागलेल्या हरिजनांनी गांधीकडे शिष्टाई केली. गांधीने त्यांना सांगितले की, तुम्हाला काही एक मिळणार नाही. या