३०-११-१९४५ निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल - Page 606

५६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सर्व परिस्थितीचा तुम्ही शांत चित्ताने विचार करा. ही वेळ मोठी आणीबाणीची

आहे. हजारो वर्षापासून आपणास गुलामगिरीत डांबून ठेवण्यात आले

आहे. आजही त्या गुलामगिरीचे चटके आपण सोशीत आहोत. यापुढे या

गुलामगिरीचा समूळ उच्छेद करायला तुम्ही तयार व्हा. त्यासाठी आपण

राजकीय सामर्थ्य (सत्ता) मिळविले पाहिजे. गांधींच्या ढोंगी हृदय पटलावर

विश्वास ठेवू नका. यापुढे आणखी दोन हजार वर्षे गेली तरी परिवर्तन होणार

नाही. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. आपला उद्धार आपणच केला

पाहिजे. राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. ही

गोष्ट लक्षात ठेवा. (टाळ्या) या दृष्टीने आगामी निवडणुकांचे अतिशय महत्त्व

आहे. आमचा लढा हा कौरव पांडवांच्या संः॥मासारखा आहे. हिंदू आणि

अस्पृश्यातील हा संग्राम अखेरचाच आहे. या निवडणूकातून या देशाचे भवितव्य

ठरविणारी घटना समिती निर्माण होणार आहे. तीमध्ये बहूसंख्यांक आणि

अल्पसंख्यांक जमाती यांचे संबंध याचा निर्णय लागेल. आपले योग्य आणि लायक उमेदवार गेले पाहिजेत. त्यासाठी प्रचंड प्रयत्न झाला पाहिजे आणि कायदेमंडळातील आपल्या सर्व जागा आपण मिळवल्या पाहिजेत. नवी राजकीय घटना येवू घातली आहे. काँग्रेस आणि हिंदू महासभा त्यावेळेस तहनामा करील आणि हे हिंदू लोक हजार वर्षांपूर्वीची परिस्थिती परत आणतील हे लक्षात ठेवा. काँग्रेसचे लोक स्वराज्याचा टाहो फोडतात पण माझा त्यांना सवाल आहे. आमच्यावर कोणाचे राज्य होणार ? पाटीदार-धनिक, तालुकदार-भांडवलदार की, वरिष्ठ हिंदुंचे राज्य ? गेली वीस वर्षे मी हेच विचारतो आहे. इतर कुणाहीपेक्षा स्वराज्याची निकड आम्हाला जास्त आहे. आम्हाला आमचे राज्य पाहिजे आहे. तेच आपले स्वराज्य खरे आहे. गेली लढाई सुरु झाली तेव्हा काँग्रेसने सरकार बरोबर असहकार पुकारला. लढाई संपल्यावर स्वराज्य देण्याचे वचन द्याल तरच आम्ही मदत करू असे सरकारला काँग्रेसने सांगितले. काँग्रेसने सरकारला जो सवाल केला तोच माझा काँग्रेसला सवाल आहे. न्याय- नीती-सचोटी-प्रामाणिकपणा असेल तर त्यांनी स्वराज्यात अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधीत्व देऊन शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक प्रगतीचे बाबतीत स्वराज्यात अस्पृश्यांना योग्य सवलती आणि संरक्षण देवू अशी हमी द्यावी. पण ते तसे आश्वासन देत नाहीत. त्याबाबत ते काही बोलत नाहीत. जो बोलत नाही त्याच्या पोटात काही काळेबेरे असते, विष असते. हे लक्षात घ्या. माझ्या गुजराती बांधव हो ! मला महाराष्ट्राची काही एक चिंता वाटत नाही. कारण ते संघटीत आहेत. ते कोणाला फसू शकत नाहीत. संघटनेच्या प्रचंड सामर्थ्यामुळे ते विरोधकांचा धुव्वा उडवितील याची मला खात्री आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातेत अस्पृश्यांसाठी चार जागा