३०-११-१९४५ निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल - Page 607

निवडणुकीच्या माध्यमातूनच . . . . हस्तगत करता येईल ५६७

आहेत. या चारीही जागा फेडरेशन लढविणार, लढविल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमच्या विरोधकांजवळ प्रचार-पैसा-माणूसबळ विपूल आहे. हे आम्ही जाणतो. पण त्यांच्या जोरावर विजय मिळविणे हा काही खरा विजय नव्हे. आम्ही मारून मरू पण या संग्रामातून पळणार नाही. हा आमचा निश्चय आहे. तो सफळ करणे आपल्या हाती आहे. काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला व लाचलुचपतीला ठोकरीने उडवा. तीर्थयात्रा पायी केल्याने पुण्य लाभते असे म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्ही येत्या निवडणुकीत आपल्या समाजाच्या उद्धाराचे पुण्य संपादण्यासाठी स्वतः पायी जावून, फेडरेशनच्याच उमेदवारांना मते द्या आणि त्यांना निवडून आणा. अखिल भारतीय दलित फेडरेशन हीच आपली एकमेव अशी राजकीय संस्था आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही एकत्रित व्हा. शेवटी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावयाची आहे. या अहमदाबाद शहरात मील मजदूरांची प्रचंड संख्या आहे. हे मजूर बहुसंख्यांक अस्पृश्य आहेत. कायदे मंडळात या शहरातील कामगारांच्या प्रतिनिधींसाठी दोन जागा आहेत. गेल्यावेळी येथील मजूर महाजन या काँग्रेसवादी संस्थेने अस्पृश्य कामगारांच्या मतावर गुलजारीलाल नंदा व खंडूभाई देसाई यांना कायदेमंडळात निवडून पाठविले. हे आपले प्रतिनिधी होवू शकतात काय ? यावेळी या दोनही जागा आपण लढवून आपलेच उमेदवार निवडून आणू. भांडवलदार व काँग्रेस यांच्या तंत्राने चालणाऱ्या मजूर महाजन या संस्थावर विश्वास ठेवू नका. शेवटी तुम्हा सर्वास असा इशारा देतो. भविष्य ओळखा, आपली गुलामगिरी नष्ट करावयासाठी आगामी निवडणूका जिका आणि विजय मिळवा. ( प्रचंड टाळया व जयघोष )

छ छ ®