९-१२-१९४५ अधिकारांचे किल्ले ताब्यात असले तर भय बाळगण्याचे कारण नाही - Page 614

पु७४ डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भापणे

परिषदेसंबंधी सरकारचे धोरण जाहीर करणारे पत्रक व्हाइसरॉयसाहेबांनी काढले होते त्यात त्यांनी राजकीय दृष्टीने ' अस्पृश्य व अस्प्रृश्येतर हिंदू ' असा. हिंदू समाजाचे दोन तुकडे पाडणारा शब्दप्रयोग केला होता. धामिक दृष्टीने अस्पृश्य लोक खरोखरीच निराळे आहेत की नाहीत ही गोष्ट जरी दृष्टीआड केली तरी राजकीय दृष्टीने अस्पृश्य समाज स्पृश्य हिंदू लोकांपासून निराळा, भिन्न असा मानण्यात आला होता. परंतु सर्व राजकारणाच्या आंदोलनातून वः व्हाईसरॉयसाहेबांच्या पत्रकातून गांधींचा ' आतील आवाज ' जागृत झाला व त्याः आवाजानुसार गांधींनी एक पत्रक काढून त्यात जाहीर केले की ' अस्पृश्य व॑ अस्पृश्येतर हिंदू अगर सवर्ण हिंदू ' हा राजकीयदृष्ट्या हिंदू समाजाचे तुकडे पाडणारा शब्दप्रयोग गैरवाजवी आहे :

याच्या मुळाशी काय आहे? तुम्हाला कोरव-पांडवांच्या युद्धाची थोडी माहिती असेल. कौरव शंभर होते व पांडव पाच. होते. . कौरवांमी सर्व राज्य. बळकावले होते. या राज्याचा काही भाग पांडवांना मिळावा व हे. युद्ध टाळता, यावे म्हणून कृष्ण शिष्टाई करण्याकरिता कौरवांचा नेता दुर्योधन याच्याकडे मेला: व त्याला सांगितले की, अर्धे राज्य तुम्ही घ्या व अर्धे राज्य पांडवांना द्या. परंतु. दुर्योधनाने ते मान्य केले नाही. त्यावर कृष्ण म्हणाला की या राज्यातील; दंडकारण्य तरी पांडवांना द्या. त्यावर दुर्योधनाने उत्तर दिले की, दंडकारण्यच.- काय पण सुईच्या. अग्रावर जेवढी माती राहील तेवढी जमीनही. मी देणार नाही...

अशाच प्रकारची गांधींची व काँग्रेसच्या लोकांची अस्पृश्य लोकांविषयी मनोवृत्ती आहे. याचे कारण काय ?

राजकीय दृष्ट्या हिंदू समाजाचे असे दोन भाग पाडल्याने मुसलमानांफ्रमाणे: अस्पृश्यांना राजकारणात. स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार आहेत, ही गोष्ट गांधी कः त्यांचे हस्तक जाणून आहेत. | |: 4 0 2 य क

मध्यवर्ती असेंब्लीच्या निवडणुकीचा निकाल लागून. फार दिवस झाले: नाहीत. या निवडणुकीत मुसलमान लोकांचा स्वतंत्र मतदार संघ असंल्यामुळेः मुसलमान लोक मुस्लिम लीगच्या बाजूने प्रचंड बहुमताने निवडून आले. मुस्लिम: लीगशी कॉँग्रेसला लढण्याचे सामर्थ्य राहिले नाही. :

परंतु नवीनच उदयास आलेले आणि इतर काही पक्ष, जस्टीस पार्टी, हिंदू महासभा वगैरे, या सर्व पक्षांचा या निवडणुकीत बोजवारा उडाला |

यशापयश येणे जरी सर्वस्वी हाती नसले तरी पण एक गोष्ट निर्विवाद आहे. लढताना अपयश येण्याने निरुत्साही होण्यांचे काहीच कारण नसते. परंतु काही पक्षांनी आपला कारभारही आटोपता घेण्याचे ठरविले.