डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५७६
का नाही. हे या अमुक उमेदवाराला तिकीट दिले. त्या दुसऱ्याला दिले
पाहण्याचे काम तुमचे नाही.
तुम्ही लोकांनी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य काय आहे, हे नीट समजावून
घेतले पाहिजे.
ज्या पक्षातर्फे हे उमेदवार उभे केले आहेत त्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन
या पक्षाची भूमिका काय आहे ? त्या पक्षाची दिशा कोणती ? मार्ग
कोणते ? ध्येय काय आहे ? हे समजावून घेणे तुमचे कर्तव्य आहे.
मुंबई प्रांतातील बहुतेक सर्व जिल्ह्यातून उभे केलेले उमेदवारच यावेळीही का
उभे केले असे कोणी म्हणेल.
तुम्ही सर्व जण जाणता की आपणाला काँग्रेसशी लढा करावयाचा
आहे. काँग्रेस जवळ मुबलक पैसा आहे. दोन चार हजार रुपये ओतून
कोणाही उमेदवाराला ते सहज वळवू शकतील. ज्याप्रमाणे एखादा लोखंडी
खांब जमिनीत रोवला असता ऊन, वारा, पाऊस कशाचीच उपाधी त्याला होऊ शकत नाही, तो वाकत नाही अगर मोडत नाही त्याप्रमाणेच हे उमेदवार लोखंडी खांब आहेत. वाकणार नाहीत अगर मोडणार नाहीत ही माझी खात्री झालेली आहे.
यावेळी तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती ही की, जबाबदारी एकदोन माणसांची नाही. जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. माझा भाऊ उभा केला नाही म्हणून एक रुसतो तर कोणी माझा बाप, चुलता वगैरे नात्यातील माणूस उभा केला नाही म्हणून रागावतो.
माझी दोन मुले आहेत, त्यांनीही समाजकार्य हाती घेतले आहे, असे मला
आज पुष्कळ लोक सांगत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी एकाला तरी
निवडणुकीला उभा करा असेही म्हणताहेत. परंतु अधिकाराच्या जोरावर मी माझ्या मुलांना वर चढविले असा माझ्यावर आरोप करायला कोणालाही जागा मिळू नये असा माझा संकल्प आहे.
हे जे उमेदवार येत्या निवडणुकीकरिता उभे केले आहेत त्यांच्यात जरी काही अंशी कमतरता असली तरी ती भरून काढण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. ज्यादिवशी ही नौका पैलतिराला नेण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही असे मला दिसून येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन.