१०-१२-१९४५ आपण अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? - Page 617

२२९
आपण अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही
तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ?

वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनची पहिली परिषद अकोला (वऱ्हाड) येथे तारीख ९ व १० डिसेंबर १९४५ रोजी भरली होती. या परिषदेला अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व मध्यप्रांत अशा दूरदूरच्या ठिकाणाहून शेकडो प्रतिनिधी उपस्थित झाले होते. परिषदेला पाऊण लाख लोक हजर होते.

परिषदेचे वैशिष्ट्य

अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथमच आगमन असल्यामुळे वऱ्हाड

प्रांतातील चारही जिल्ह्यातील हजारो स्त्री-पुरुष बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता

आले होते. काही भागातून दोन दिवसांचा प्रवास करुनही लोक आपल्या

'आवडत्या पुढाऱ्याच्या दर्शनाकरिता व त्यांचा संदेश ऐकण्याकरिता आले

होते. बाबासाहेब अकोल्याला येणार असल्याचे आगाऊ माहित असल्यामुळे

खास सिनेमातून “अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब

आंबेडकर हे तारीख १० डिसेंबर १९४५ ला अकोल्याला उपस्थित राहून भाषण

करणार आहेत .'' अशा तऱ्हेची जाहीरात दहा दिवस अगोदर दाखविली जात

होती. थोडक्यात बाबासाहेबांच्या आगमनाविषयी सबंध अकोल्यातील जनतेला

नव्हे तर वऱ्हाड प्रांतातील जनतेला आमचे अनभिषिक्त राजे, आमचे पुढारी

आम्हाला केव्हा भेटतील अशी उत्कंठा लागून राहिली होती. अकोल्याला

येईपर्यत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत

झाल्यामुळे त्यांना सबंध रात्रभर त्रास झाला होता. प्रतिनिधींना मुलाखती व

मध्यप्रांतातील पुढाऱ्यांशी आगामी निवडणुकी संबंधी त्यांनी पाऊण तास चर्चा

केल्यावर प्रमुख पुढाऱ्यांचा फोटो घेण्यात आला.

अकोला स्टेशनापासून प्रचंड मिरवणुकीला सुरुवात झाली. या

मिरवणुकीची लांबी तीन चार फर्लाग होती. अकोला स्टेशन ते टिळक

मैदानापर्यंतचा रस्ता स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. या मिरवणुकीत अखिल

Se SE HI हक क

जनता : २२ डिसेंबर १९४५.