१०-१२-१९४५ आपण अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? - Page 618

पुए८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे उत्साही जनरल सेकेटरी श्री. राजभोज

भारतीय संस्थानी शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे अध्यक्ष सुबय्या, म्यु. कामगार

परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. सज्जमसिंग; शांतांबाई 'दाणी, नाशिक, वगैरे

प्रामुख्याने दिसत होते. वऱ्हाड प्रांतातील जिल्ह्यातील समता सैनिक दलाने

या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेऊन उत्तम प्रकारे शिस्त सांभाळली

होती. दुतर्फा सैनिक दल, मधोमध पुढाऱ्यांच्या मोटारी, मागे महिला मंडळ व

इत्तर जनसमूह व सर्वांच्या आघाडीला नानाविध वाद्यांचे लाफे आणि मर्दानी दांड-

पट्टयांचा खेळ आणि बॅंड अशा उत्साही थाटात व बाबासाहेबांच्या जयघोषात

मिरवणूक चालली होती. मिरवणुकीत ' डॉ. आंबेडकर कौन है | दलितोंका:

राजा है || ' शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचा विजय असो,' ' हरिजन नावाचा

धिक्कार असो, ' ' आंबेडकर झिंदाबाद | थोडे दिनमें भीमराज *। वगैरे

गगनभेदी घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले होते हीही

अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूक 'साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात' विसर्जन पावल्यावर श्री. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी ' उभारलेल्या शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचा निळा झेंडा उंचावर जाउन फडकला. समता सैनिक दलाने त्याला खडी सलामी दिली. त्यावेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व फेडरेशनच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते |

समता सैनिक..दलाची. परिषद्र श्री. सुब्बय्या, यांच्या अध्यक्षतेखाली पार्‌ पाडल्यावर लगेच,महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात. आली... सौ. गिताबाई गायकवाड व मिसेस नाईक यांनी महिलांना स्फूर्तिदायक. आदेश, दिल्यावर परिषदेचे कामकाज संपले

बरोबर साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडपात आगमन झाले त्यावेळी गगनभेदी. घोषणांनी ब्र टाळ्यांच्या कडकडाठानी सारे 'बाताबरष- हर्षोत्फुल्ल झालेले होते. ध्येयनिष्ठेनी ओथंबलेल्या त्या. अस्पृश्य वर्गाचा: स्वाभिमान व स्वावलंबन याचे हे दिव्य प्रतीक पाहून स्वधर्मीय व विधर्मीय लोकांच्या तोंडून आपोआपच धन्योद्गार बाहेर पडत होते

परिषदेचे कामकाज

परिषदेची सुरूवात बरोबर साडेसहा वाजता नागपूरचे शेंद्रे वकील यांनी आपल्या सुस्वर गायनानी केली. स्वागताध्यक्ष श्री. 'डी. झेड. पळसपगार यांनी आपल्या भाषणात जमलेल्या मंडळीचे व बाबासाहेबांचे स्वागत केले.