१०-१२-१९४५ आपण अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? - Page 620

५८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व बनारस हिंदू विश्वविद्यालयाला १९ लाख भांडवल पुरवून सहाय्य केले

आहे. शिवाय या दोन्हीही संस्थांना सालिना ३ लाखाची मदत चालूच

आहे. मी तेथे गेल्यानंतर सरकारने अस्पृश्यांकरिता ३ लाख रुपयांची मदत चालू केली आहे. शिवाय ३०० कॉलेज-शिष्यवृत्या, प्रत्येकी ६० रुपयांच्या, मंजूर

झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जर मदत द्यावयाची तर ती भरपूर द्यावयाची असे

धोरण आखले आहे. याचवर्षी ३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायतेस

जातील. आता अशी व्यवस्था केली आहे की, निदान २ वर्षात १५ विद्यार्थी

विलायतेला येथून जातील. याप्रकारची पूर्वी कधीही नसलेली ही व्यवस्था आज

झाली आहे. आता नोकरी संबंधी पहा. मुसलमानांना शेकडा २०, खिश्चनाँना

शेकडा साडेआठ, पण आपल्याला मात्र अशा प्रक:रचे प्रमाण पूर्वी अजिबात

नव्हते. फक्त 'यांचेकडे लक्ष पुरवावे' एवढीच शिफारस होती. पण नुकतीच

माझी मागणी सरकारला पटून आमचेही नोकऱ्यात शेकडा आठ पूर्णाक एक

तृतीयांश असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. मी तेथे गेलो तेव्हा माझ्या खात्यात अस्पृश्यांचे हमालसुद्धा नव्हते. पण आता डेप्यूटी सेक्रेटरीज २, अंडर सेक्रेटरी १ व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स ३ असे अस्पृश्य वर्गाचे लोक भरले आहेत. कोणी म्हणतात की, मी महारांचेच हित करतो. मी महार जातीत जन्मलो याला मी काय करू. पण माझ्याविरूद्ध केली जाणारी ही तक्रार

खोटी आहे. माझ्याच खात्यात सिमल्याला २८ क्लार्क पैकी *१८ भंगी आहेत. विलायतेला जाणाऱ्या लोकात १ मांग, १ भंगी व चांभार पुष्कळच आहेत. मी आणखी एक गोष्ट यातच सांगू इच्छितो. एक मळकट असा भंगी अस्पृश्यांचा उमेदवार जेव्हा मुलाखती करता सिमल्याला आला तेव्हा त्याला खात्रीने नकार मिळेल हे जेव्हा मला समजले तेव्हा बोर्डावर मी माझे वजन आणून

त्याला निवडून घेतले. आता तो उमेदवार परदेशात आहे. मी स्वतःची आत्मप्रौढी करतो असे मात्र समजू नका. सांगण्याचा हेतू हाच की, राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू शकतो आणि म्हणूनच अस्पृश्य समाजाला इज्जत व माणुसकीसाठी राजकारण काबीज करायला पाहिजे. म्हणजेच फेडरेशनच्या प्रतिनिधींना कायदे मंडळात जाऊन आमच्यावरील जुलूमाविरूद्ध आवाज काढता आला पाहिजे. ही एक आमची मागणी आहे.

१९२० साली गांधींनी हरिजन संघ काढला. या संघातून हरिजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देण्याचा उपक्रम सुरू केला. हेतु इतकाच की, आमच्या स्वाभिमानी चळवळीपासून त्यांना आपल्या गोटात ओढणे. या बाबतीत मी अस्पृश्य

nM 2 जत हीत 5000040:0003 00943 दिल

*मूळ प्रतीत आकडा दिलेला नाही. परंतु १८ भंगी असल्याचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथील दि. ४ ऑक्टोबर १९४५ च्या भाषणात केला आहे.