१०-१२-१९४५ आपण अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? - Page 621

आपण अन्यायाचा प्रतिबंधच . . . . . . तरी आहे काय ? ५८१

विद्यार्थ्यांना इतकेच सांगतो की, असल्या आमिषांचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या पण कर्तव्याला जागा, हे मला तुम्हाला सांगावयाचे आहे. पुराणातील देव व दैत्य यामध्ये जे युद्ध झाले होते त्या युद्धाला यश येण्याकरता कचाला संजीवनी मंत्र शिकविण्याची देवांनी युक्ती काढून सफलही केली, कचासारखी वृत्ती तुम्ही आपल्या कृतीत उतरुन त्याचप्रमाणे वागा, यातच समाजाचे हित आहे. .

या देशात असंख्य जाती व धर्म आहेत. यात सामाजिक समता अगर संघटना नाही. जाती जातीत रोटीभेद. बेटी व्यवहार होत नाही आणि कदाचित झालाच तर अपवाद म्हणून समजावा. जर महाराच्या मुलाने ब्राह्मण मुलीशी लग्न केले अथवा ब्राह्मण मुलीने महार मुलाशी लग्न केले तर त्याबद्दल मला काही एक वाटणार नाही. पण मी असे विचारतो की, अशा तऱ्हेच्या विवाहाने अस्पृश्यांची अस्पृश्यता नाहिशी होईल काय ? आमच्या मुली का काळ्या आहेत की नकट्या आहेत का कुरूप आहेत ? मी असेही तुम्हाला विचारतो की, अस्पृश्याने, स्पृश्य वर्गाच्या मुलीशी लग्न करण्यात मतलब काय ?

स्वराज्याच्या प्रश्‍नावर आमचा मतभेद नाही. पण या स्वराज्यात आम्हाला आमचे हक्क प्राप्त झाले पाहिजे. तुमच्या स्वराज्यात आमच्यावर कुणाचे राज्य होणार या प्रश्‍नाचे उत्तर द्या असे काँग्रेसला मला सांगावयाचे आहे.

सध्या आपल्या जवळ कोणतेच साधन नाही. स्पृश्य लोक सत्ताधीश आहेत आणि म्हणून ते पाहिजेत त्या गोष्टी ठरवितात. काँग्रेस ही आपली हितशत्रु आहे. त्यांच्याजवळ मुबलक पैसा, वाहनाची साधने व इतर उपकरणे आहेत, ती आपणाजवळ नाहीत. या मोहाला आपल्यातील कितीतरी सहज बळी पडून गेली आहेत, पण मी मात्र पडलो नाही (हंशा). तेव्हा मला तुम्हाला हे स्पष्ट सांगावयाचे आहे की, अशाप्रकारच्या साधनांची अपेक्षा न करता केवळ आपल्या पक्षाचे कर्तव्य म्हणून, पायी जाऊन ज्यांना मताधिकार असेल त्यांनीं विनामूल्य समाज सेवा घडावी म्हणून, फेडरेशनच्या उमेदवारालाच मते द्यावीत, हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. ।

देशातील अल्पसंख्यांकांना वाटणारी भीती दूर करण्यासाठी झटत असल्याचे काँग्रेस म्हणते, पण तसे काहीच नाही. सर्व देशाचे प्रतिनिधी असा तिने चालविलेला प्रचार फसवणूक करणारा आहे. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य