डॉ. वाबासाहेव आंवेडकर लेखन आणि. भाषणे ५८२
पुढाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. ब्रिटिश जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून काँग्रेसच्या
निरनिराळ्या अल्पसंख्याकाच हक्क निघून गेल्यावर आणि स्वराज्य मिळाल्यावर
करण्यासाठी मध्यवर्ती सरकारात कसे संरक्षिले जातील याचा विचारविनिमय
करावयास पाहिजे काँग्रेसने एक हिंदी गोलमेज परिषद बोलावून वाटाघाटी
होत्या. हे करण्याच्या ऐवजी काँग्रेसने इतर पक्षाला डावलले आणि आपल्याच
हाती सत्ता असावी असा दावा सुरू केला. काँग्रेसचा हा दुराग्रह आम्ही कबूल
करणार नाही. काँग्रेसपासून अलिप्त राहाण्यासंबंधीच माझा तुम्हाला सल्ला आहे. र, ककी "४
आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी
स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्यांच्याबिरूद्ध काही तकार केली तर ती लकार देखील ऐकून घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही. काय करावे. तेव्हा मी म्हणतो, हे.जरी. खरे
असले तरी मी तुम्हाला असे विचारतो की, शेळी. होऊन अशा प्रकारचे आयुष्य किती दिवस आणखी कंठणार ? कधी ना कधी तरी अन्यायाविरूद्ध तोंड काढावे लागणार नाही काय ? आपण जर यां अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर
आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? मी सुम्हासमौर कोट, बूट, पाटलौंण
घालून उभा आहे. माझ्या हातात सोन्याचे घड्याळ आहे. मी स्वच्छ आहे. मला महार म्हणण्याची कोणाची ताकद आहे काय ? तरी पण मी महार
आहे (हंशा). ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मौ जर कच खाल्ली असती तर ही स्थिती प्राप्त झाली असती का? माझ्या हातात सोन्याचे घड्याळ
दिसते ते दिसले असते काय ? (हंशा) तेव्हा सांगण्याचा मतलब हा की अन्यायाच्या विरूद्ध तुम्ही लोकांनी 'जशास तसेच' या न्यायाने प्रतिकार करायला
शिकले पाहिजे. कर्तव्याला जागरूक रहा. तेव्हा मला तुम्हाला शेवटी इतके
सांगावयाचे आहे की, यापुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे. त्या करता आपण आपली तयारी भक्कम पायावर केली पाहिजे आणि आपल्या फेडरेशनच्या
सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून: द्यायाला पाहिजे. ` हिंदुस्थान सरकारने, . प्रांतिक: विधीमंडळामध्ये. निवडून आलेल्या. प्रतिनिधींमधून, घटना समिती :निवडली जाणार . असल्याची घोषणा केली आहे... या समितीकडून
तयार होईल ती घटना बऱ्याच वर्षाकरिता अस्तित्वात राहिल, कदाचित ती कायमसुद्धा होईल. काँग्रेसने आपल्या काही जागा पट्काविल्या तर आपले पले नुकसान होईल आणि म्हणून आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता येणार नाही. . त्याकरिता अहोरात्र प्रयत्न करुन आपल्या सर्व जागा काबीज केल्या पाहिजेत... इतका तुम्हाला आदेश देऊन मी माझे भाषण संपवितो