आणि भाषणे डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन पू८४
येथे येण्यापूर्वी ते वऱ्हाड- त्यांच्या ह्या दौऱ्यातील ही शेवटची सभा होती.
जाऊन आले. मध्ये अकोला व महाकौशलमध्ये रायपूर शहरी
भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेबांनी सर्व पक्षांनाच स्वराज्य पाहिजे आहे असे सांगितले. ते म्हणाले,
मतभेद फक्त एकाच मुद्यावर आहे आणि तो म्हणजे ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडल्यावर येथे कोणी राज्य करावयाचे या मुद्यावर, काँग्रेसचे पुढारी सांगतात की, काँग्रेसखेरीज इतर पक्षांना स्वराज्य नको आहे, पण ही गोष्ट धादांत खोटी
आहे.
मी आपणा सर्व दलितवर्गीयांच्या वतीने सर्वांना असे बजावित आहे की, यापुढे होणाऱ्या हिंदुस्थान सरकारमध्ये अस्पृश्यांना दुय्यम स्थान दिल्यास ते कधीही सहन केले जाणार नाही. आम्हाला आमचे राजकीय हक्क मिळालेच पाहिजेत आणि ते मिळविण्यासाठी लढण्याचा आम्ही निश्चय केला आहे.
गेल्या वीस वर्षात आमच्यासारखा अल्पसंख्यांकांचा विश्वास पैदा करण्यासाठी
काँग्रेसने कोणताही प्रयत्न केलेला नाही. काँग्रेस ही स्वतःला देशाची प्रतिनिधी म्हणविते, परंतु हे खरे नसून लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेस पुढारी असे सांगून मुद्दाम लोकांची दिशाभूल करीत आहेत.
उदाहरणार्थ, सर्व अस्पृश्य समाज हा काँग्रेसच्या पाठीमागे नसून ऑल इंडिया
शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्याच पाठीमागे आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थान देश
सोडल्यानंतर मध्यवर्ती सरकारात कोणाला कोणते व किती स्थान असावे
यासंबंधीचे मतभेद मिटविण्यासाठी काँग्रेसने सर्व अल्पसंख्य पक्षांच्या पुढाऱ्यांची एक परिषद भरवून सर्वांच्या मनातील अविश्वास दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करावयाला हवा होता, पण त्याऐवजी काँग्रेसने देशातील इतर पक्ष जणू अस्तित्वात नाहीत अशा आविर्भावाने सर्व सत्ता आपल्या ताब्यात दिली जावी असे
सांगितले.
मी सर्वांना माझ्या अस्पृश्य समाजाच्या वतीने असे सांगतो की काँग्रेसला आमचे प्रतिनिधीत्व करण्याचा कोणताही हक्क नाही आणि माझे तुम्हा सर्व ज्ञातिबांधवांना असे कळकळीचे सांगणे आहे की, आपण आपला पक्ष स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून संघटित करून आपल्या रास्त राजकीय हक्कासाठी झगडत राहिल्यानेच आपले कल्याण होणार आहे.