१२-१२-१९४५ कम्युनिस्टांपासून सावध राहा - Page 625

. कम्युनिस्टांपासून सावध रहा ५८५

येत्या निवडणुकी त्यादृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये आपणासाठी राखून ठेवलेल्या चौदाही जागांवर शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे उमेदवार निवडून येतील अशी काळजी घ्या. आपल्या

हाती सत्ता आल्याशिवाय राज्यकारभारात आपल्या म्हणण्याला महत्त्व राहणार नाही. सर्व कष्ट सहन करा, निर्भय बना, हीनगंड झाडून टाका आणि आपल्या देशाच्या राज्यकारभारात आपल्याला योग्य वाटा मिळालाच पाहिजे, असा

आग्रह धरा. |

येत्या निवडणुकी ह्या आपल्या समाजाच्या दृष्टीने अत्यतं महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जर आपली प्रगती करावयाची असेल तर आपल्याला राजकीय सत्ता मिळविलीच पाहिजे. आपल्या राजकीय हक्कासंबंधी आपण कोणती आकांक्षा बाळगावी हे आम्हाला कोणताही राजकीय पक्ष सांगू शकत नाही किंवा कोणतीही राजकीय सत्ता आम्हाला त्या बाबतीत माघार घेण्यास भाग पाडू शकणार नाही आणि मला खात्री आहे की, यापुढे कोणी पुढारी अस्पृश्यांना दुय्यम स्थान देऊ पाहील तर ती गोष्ट आम्ही कधीही सहन करणार नाही.

ज्याप्रमाणे अल्पसंख्यांकांचा विश्वास काँग्रेसला संपादन करता आलेला नाही, त्याचप्रमाणे सवर्ण हिंदुंवरही काँग्रेसचा विशेष प्रभाव आहे असे नाही. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चालविलेल्या अस्पृश्यता नष्ट करण्याच्या व मंदीरप्रवेशाच्या | चळवळीमध्ये काँग्रेसला संपूर्ण अपयश आलेले आहे. त्यांच्या चळवळीचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. मी नुकताच जगन्नाथपुरी येथे गेलो. | होतो. तेथील जगन्नाथाचे देवालय मला बाहेरूनच बघावे लागले. त्या देवालयाच्या आत जाऊन मला जगन्नाथाची मूर्ती पाहता आली नाही. यावरून लक्षात येईल की, आपले हक्क मिळविण्यासाठी आपल्याला आपल्याच संघटनेवर भिस्त ठेवली पाहिजे आणि शेकडो वर्षे हिंदुंकडून सोसलेल्या कष्टातून आपली मुक्तता करून घेतली पाहिजे. ।

कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. कारण गेल्या काही वर्षातील त्यांच्या कृत्यावरून ते कामगारांचे अहित करीत आहेत, किंबहुना ते त्यांचे शंत्रु आहेत अशी माझी खात्री झाली आहे. काँग्रेस भांडवलवाल्यांची संस्था आहे असे कम्युनिस्ट सांगतात आणि त्याच वेळी कामगारांना तीत प्रविष्ठ होण्याचा उपदेश करतात ! हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना त्यांचे असे काही धोरणच नाही, त्यांना सर्व स्फूर्ति रशियातून

मिळते.