३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाइट - Page 71

साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट ३३

त्रिवार प्रचंड जयघोष झाला. आरंभी श्री. सावंत, ढेंगे, बैसाणे, पुनाजीराव

लळिंगकर वगैरे मंडळींनी त्यांची मुलाखत घेतली. समतावादी दलित मंडळाचे

सेक्रेटरी श्री. तुकाराम पहिलवान यांनी संघातर्फे व सौ. पार्वताबाई अहिरे यांनी

चोखामेळा बोडिंगतफ आणलेले हार डॉ. बाबासाहेबांचे गळ्यात घातले. नंतर

स्टेशनपासून ट्रोवलर्स बँगलोपर्यत मि. पाटील वकील यांचे मोटारीतून

डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली. सदरहू वेळी, आंबेडकर चौक,

लळिंग, अवधान, वर्व्हाळ, जुने धुळेमील येथील स्काऊटच्या मंडळींनी उत्तमप्रकारे

शिस्त ठेविली होती. मिरवणूक सदरहू बंगल्यापर्यंत येताच तेथेही बाहेर गावाहून

आलेल्या स्त्री, पुरुष व मुलांचा अफाट समुदाय जमला होता. इतकेच नव्हे तर

डॉक्टर बाबासाहेबांचे दर्शनास लळिंग येथील अनेक मोळविक्या स्त्रियाही आल्या

होत्या. सदरहू बंगल्यातून डॉ. बाबासाहेबांचे दर्शन झाल्याशिवाय अस्पृश्य

स्त्री, पुरुष हालेनात. नंतर डॉ. बाबासाहेब हास्यवदन करीत बंगल्याचे बाहेर

आले. त्यांनी मंडळींना आता कोर्टाचे काम आहे ते संपल्यानंतर आपण मला

ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी येईल, असे सांगून सर्व मंडळींना

जाण्यास सांगितले.

दुपारी कोर्टाचे काम संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब यांना

हरिजन सेवक संघाचे चिटणीस श्री. बर्वे वकील यांचे घरी बरोबर चार वाजता

श्री, जाधव, एम.एल.ए., श्री. सावंत, श्री. पुनाजीराव लळिंगकर, श्री. तुकाराम

' पहिलवान व श्री. ढेंगे वगैरे मंडळीसह टी पार्टी झाली. तेथे काँग्रेसची काही

'भंडळी हजर होती. तेथे बरीच चर्चा झाली. नंतर डॉ. बाबासाहेब यांनी

राजेंद्र हरिजन छात्रालयाला व चोखामेळा बोर्डिगला भेट दिली. तेथेही

डॉ. बाबासाहेबांना स्वोद्धारक वसतिगृह, हरिजन छात्रालय व चोखामेळा

बोडिंगतर्फे हारगुच्छ अर्पण करण्यात आले.

नंतर ठरल्याप्रमाणे धुळे विजयानंद थिएटरमध्ये डॉ. बाबासाहेबांचे फारच जोरदार भाषण झाले. सदरहू थिएटर अफाट स्पृश्यास्पृश्य स्त्री-पुरुषांनी

दुमदुमून गेले होते. जागेच्या अभावी कित्येकांना बाहेर उभे राहावे

क्षागले.

डॉ. आंबेडकर म्हणाले,

उद्या ता. १ ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा, असे काँग्रेसने फर्माविले आहे. काँग्रेस पक्षानी राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्यासारख्याने कोणी