३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाइट - Page 74

३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नंतर स्काऊटसह डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर चौकास भेट दिली व डॉ. बाबासाहेबांची मोटार सायंकाळी ६ वाजता धुळे स्टेशनवर गेली.

आज रोजी धुळे प्रताप मिल चालू होती. ती पाच वाजता बंद होते. मिलची सुट्टी झाल्यावर पुन्हा स्टेशनवर अनेक स्त्री-पुरूष डॉ. बाबासाहेबांचे दर्शनास जमले होते. तेथे स्काऊटच्या लाठीकाठीची डॉ. बाबासाहेबांना सलामी देण्यात आली. सदरहू वेळी भीमराव साळुंखे, वेसा पहिलवान, शंकरराव घोडे, | किसनराव वगैरे मंडळीनी लाठीचे हात फिरविले. सदरहू ठिकाणीही अनेक स्त्री-पुरूषांनी डॉ. बाबासाहेबांना हार अर्पण केले. नंतर ६-४० वाजता सर्व मंडळींना निरोप दिला व गाडी चाळिसगावी गेली.

पूर्वी ठरल्याप्रमाणे डॉक्टरसाहेब रात्रौ ८-३० वाजता चाळिसगावला नक्की येणार हे ठरल्यासारखेच होते परंतु इतक्यात एक बातमी आली की, डॉक्टरसाहेबांना घेऊन येणाऱ्या आगगाडीचे इंजिन वाटेत जामदे स्टेशन सोडताच सीक झाले. त्यामुळे लोकांमध्ये निराशा उत्पन्न झाली. १-२ तासात इंजिन नीट होऊन गाडी फारतर दोन तास उशीरा येईल, अशी लोकांची कल्पना होती. डॉक्टरसाहेबांच्या स्वागतासाठी श्री. झिपरू तुकाराम जाधव, नथ्थू दोनू जाधव, जाबरसाहेब, मांगो आनंदा जाधव हे स्टेशनवर गेले होते. बोर्डिंगमध्ये जमलेल्या लोकांचे मनोरंजन करण्याकरिता मे. भास्कर मास्तर, जगन्नाथ सुंदरनाथ यांचे पोवाडे गायन व वेडाबाई चव्हाण, शांताबाई जाधव यांच्या बोधपर पदांचे गायन वगैरे कार्यक्रम झाले. भगिनी वर्गाची बसण्याची वगैरे व्यवस्था उत्तम ठेविली होती. श्रीमती ध्रुपताबाई दिवाण, झेलाबाई पोम मोरे, सखुबाई आनंदा जाधव, सावित्रीबाई तोताराम जाधव, नारदाबाई नानाजी जाधव, भागाबाई उरवा सरदार, दयाबाई रामाजी जाधव वगैरे प्रमुख स्त्रिया हजर होत्या. शेवटी पहाटे तीन-चार वाजता गाडी स्टेशनवर येईल अशी बातमी श्री. रायला मास्तर यांनी आणली. झाले, लोकांनी बोडिंगचे आवार सोडून रात्रौ बारा वाजता स्टेशन गाठले. यापूर्वीच आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची स्टेशनवर गर्दी झाली. त्यात हा जमाव येऊन मिळाल्यामुळे स्टेशनचा सर्व भाग माणसांनी पूर्णपणे भरून गेला. लोक पहाटे चार वाजेपर्यंत जागरण करीत होते. एकदाची स्टेशनमध्ये गाडी आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सारे वातावरण दुमदुमून गेले. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरताच येथील समाजातर्फे श्री. रायला मास्तर यांनी त्यांना हार अर्पण केला. त्याचवेळी आठ मैलाचा पायी प्रवास करीत श्री. डी. जी. जाधव यांचे वडील व माता डॉक्टरसाहेबांच्या भेटीस आले. त्या उभयतांनी डॉ. बाबासाहेबांना वंदन केले. इंजिनाच्या नादुरुस्तीमुळे