साग्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट ३७
त्यांना उशीर झाला होता आणि लगेच ५ वाजण्याचे गाडीने मुंबईस जावयाचे असल्यामुळे बोडिंगमध्ये त्यांना जाता आले नाही. जमलेल्या लोकांनी त्यांचे स्वागत स्टेशनवरच केले. निरनिराळ्या संस्थेकडून त्यांना अनेक हार अर्पण करण्यात आले. डॉक्टरसाहेबांनी त्यांचा प्रेमाने स्वीकार केला आणि सर्वास आपल्या चळवळीसाठी थोडासा उपदेश करून निरोप घेतला. हा अपूर्व सत्कार समारंभ चाळीसगाव शहरात दिवसभर गाजून राहिला होता.