तुम्ही संघटन करून . . . . पक्षाला बलवान करा ३९
सामर्थ्याची कल्पना आली आहे. जे वल्लभभाई पटेल इलेक्शनपूर्वी स्वतंत्र मजूर पक्षाचे नावसुद्धा घेण्यास तयार नव्हते तेच वल्लभभाई पटेल काँग्रेसने मंत्री पदे स्वीकारली त्यावेळेस शनिवार वाड्यापुढे भरलेल्या जाहीर सभेत म्हणाले की मुंबई असेंब्लीमध्ये निरनिराळे जे पक्ष आहेत त्यामध्ये डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र ` मजूर पक्षसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे व त्या पक्षाचे म्हणणे काँग्रेसला कबूल करावे लागेल. तेव्हा हा परिणाम कशाचा, याचा तुम्ही पूर्ण विचार करा. हा परिणाम ` दुसरा कशाचा नसून आपल्या संघटनेचाच परिणाम आहे.
काँग्रेस ही हिंदू लोकांची संस्था आहे. हिंदुस्थानावर आजपर्यंत इंग्रज सरकारचे राज्य होते. म्हणून आतापर्यंत या लोकांच्या हातात राजकारणाची सूत्रे नव्हती परंतु हिंदुस्थानावर आज नुसते नावाला इंग्रज सरकारचे राज्य
आहे. राजकारणाची सर्व सूत्रे आज हिंदू लोकांच्याच हातात आली आहेत. म्हणून
यापुढे आपण आपला बचाव करण्याचा संघटित प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय
यापुढे आपणास गत्यंतर नाही. ज्या कौन्सिलमाफत राजकीय सत्तेचा विनियोग
केला जातो त्या कौन्सिलात तुमचे प्रतिनिधी गेले पाहिजेत. हिंदुस्थानात जो
सर्वत्र काँग्रेसचा जय झाला आहे तो काँग्रेसचा जय नसून तो ब्राह्मण्याचा जय
झाला 'आहे, हे तुम्ही विसरू नका. ५-६ प्रांतातील मुख्य दिवाणांच्या जागा
ब्राह्मणांकडेच गेल्या आहेत व आमच्या मुंबई प्रांतातील ११ जागांपैकी ५ जागा
ब्राह्मणांच्याच वाट्याला गेल्या आहेत. १९१९ पासून १९३५ पर्यंत कौन्सिलमध्ये
ब्राह्मण सभासदांची संख्या अत्यंत थोडी म्हणजे १०-१२ होती व ती पुढे कमी कमी
होत गेली. परंतु आज काँग्रेसच्या नावावर मुंबई प्रांतात २७ ब्राह्मण निवडून आले
आहेत. यावरून ब्राह्मण्याचा किती मोठा जय झाला आहे हे आपणास दिसून
येईल. या ब्राह्मण्यापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करावयाचा असेल तर तुम्ही
पूर्ण संघटित झाले पाहिजे. |
मागच्या राऊंड-टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस माझ्याकडून एक चूक
झाली. अल्पसंख्यांक पक्षाचा एकतरी प्रतिनिधी गव्हर्नरने मंत्रीमंडळात नेमला
पाहिजे, असा कायदाच बनवून घ्यावयास पाहिजे होता. या लोकांच्या मर्जीवर
ती गोष्ट अवलंबून ठेवावयास नको होती. परंतु त्यावेळेस मी विचार केला की
' काही वाढतीने लाजावे व काही खातीनेही लाजावे ' या उक्तीप्रमाणे मी
याबाबतीत जास्त ताणून धरले नाही. परंतु यांच्या मर्जीवर ही गोष्ट ठेवल्यामुळे
काय परिणाम झाला पहा ! त्यांनी अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी मंत्रीमंडळात
घेतला नाही. याबाबतीत कायदा नाही; परंतु शिष्टाचार म्हणून तरी त्यांनी एक
प्रतिनिधी घ्यावयास पाहिजे होता. आमच्या १५ जागांपैकी चार जागांवर
काँग्रेसने आपल्यातर्फे आमची माणसे निवडून आणली. मग त्यांना मंत्रीपद का
दिले नाही? बरे चारही माणसे नालायक आहेत असे जर म्हणावे तर मग