२३-८-१९३७ प्रांताचे प्रधान मंडळ हा प्रांताच्या बुद्धिमत्तेचा अलौकिक संचय असला पाहिजे - Page 82

४४ डॉ. वावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उत्पन्न होणार नाही अशी फसवाफसवी का ? उघड्या अंगानी हिंडण्याने, सिगारेटच्या ऐवजी विड्या ओढल्याने, बैलगाड्यातून हिंडण्याने किंवा तिसऱ्या वर्गाने प्रवास करण्याने लोकांच्या डोळ्यात धूळ का फेकतात ? विलायतेतील मध्ययुगी भिक्षु ब्रह्मचर्य, शुचिर्भोत्य व दारिद्र्य यात आपले जीवन कंठण्याची प्रतिज्ञा करीत. आपल्या मंत्र्यांना ब्रह्मचर्याचा प्रश्‍न नाही. कारण आता तो प्रश्‍न त्यांच्या हाताबाहेर गेलेला आहे. शुचिर्भोत्याच्या प्रतिज्ञेचा त्यांनी भंग केला, तर या सभागृहाला त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही. दारिक्र्याबद्दल म्हणाल तर ते भिक्षु सडेफटिंग असल्याने त्यांना ते जड जात नसे पण सध्याच्या मंत्र्यांना दारिद्र्यात जीवन कंठणे योग्य आहे काय ? मला असे म्हणावयाचे आहे की, ५०० रु. पगार ठरविण्यात मंत्रिमंडळाचा हेतू पवित्र नाही. त्यामागे त्यांचा एक डाव आहे. हे मंत्रीपद कायमचेच आपल्याकडे राहून त्यावर दुसऱ्या कोणालाही आरूढ होता येऊ नये हाच यात त्यांचा डाव आहे. . मंत्र्यांचा पगार दरमहा ४,००० किंवा ३,००० असावा असेही म्हणावयाचे नाही. मी जी या बिलावर टीका केली आहे ती केवळ सार्वजनिक धोरणाची चर्चा व्हावी या हेतूनेच केली आहे. डॉ. जॉन्सन एकदा म्हणाले होते की, बदमाश लोकांना देशभक्तीचा आश्रय घेणे सुलभ जाते. मला खात्री वाटते की, बदमाशांना मंत्रीपदावर आरूढ होणे सुलभ जाते असे म्हणण्याची पाळी आमच्यावर कधीही येणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर प्रोग्रेसिव्ह पक्षाचे पुढारी मि. अंबर क्रॉम्बी यांनी डॉ. आंबेडकरांच्या बहुतेक मुद्यांवर आपल्या भाषणात भर दिला. बॅ. जमनादास मेहतांनीही काँग्रेसच्या बिलाच्या अव्यवहार्यतेबद्दल सडकून समाचार घेतला. खा. ब. अब्दुल लतिफ, शि. ल. करंदीकर व स. का. पाटील यांची भाषणे झाल्यावर भाई अनंतराव चित्रे यांचे भाषण झाले.

oe ७ ७