१०६
अशा देवांना काय पुजावे ?
ता. २८ ऑगस्ट १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे, मुंबई येथील म्युनिसिपल हॉलमध्ये अस्पृश्य वर्गाची जंगी जाहीर सभा :
भरून खालील: ठराव पास झाले.--
ठराव १ ला.- मुंबई इलाखा महार परिषदेच्या ठरावाप्रमाणे आपल्या बंधूभगिनींनी हिंदू धर्माचे सणवार, व्रतवैकल्ये वगैरे धार्मिक विधी आणि उपोषण वगैरे धार्मिक आचार पाळू नयेत. | | |
ठराव २ रा.- वांद्रे म्युनिसिपालिटीत अस्पृश्य वर्गासाठी एक राखीव जागा दिल्याबद्दल मे. कलेक्टर साहेबांचे ही सभा आभार मानीत असून, अस्पृश्य वर्गाच्या लोकसंख्येच्या मानाने एक जागा अपुरी असल्यामुळे अधिक जागा देण्याबद्दल ही सभा मे. कलेक्टर साहेबांना विनंती करीत आहे.
ठराव ३ रा.- स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्याबद्दल सर्व जनतेस या सभेची आग्रहाची विनंती आहे. | | |
ठराव ४ था.- श्री. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या मानपत्रासाठी वांद्रे पंचायतीकडून २५ रु. देण्यात येत आहेत. तरी इतर ठिकाणच्या पंचायतींनीही या कार्यास सढळ हाताने मदत करण्याची कृपा करावी. _ सदर ठरावावर श्री. ठु. तु. शिर्के , स. मि. धोत्रे, अमरसिंग, शं. ल. वडवलकर,
ध. सो. जाधव, म. ग. जाधव, चां. ना. मोहिते, शां. अ. उपशाम, ना. भि.
असगोलकर, वां. स्कू. बो. मेंबर इत्यादी मंडळीची भाषणे झाली.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले. सूचनावजा ते
म्हणाले, धर्मातराबद्दल मुंबई इलाखा महार परिषदेने केलेल्या ठरावाची आठवण
देण्याकरिता विशेषतः आजची सभा आहे. म्हणून धर्मांतराबद्दल कोणास काही
शंका विचारावयाच्या असल्यास त्यांनी त्या अवश्य विचाराव्यात. शंका
विचारावयास कोणीच पुढे न आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या
भाषणास सुरूवात केली. ते म्हणाले, |
प्रिय भगिनींनो व बंधुंनो,
मी या सभेला येणार नव्हतो. परंतु मला समजले की येथे
जुन्या परंपरेला चिकटून राहाणारे असे काही लोक आहेत व ते महार परिषदेने पास केलेल्या धर्मांतराबद्दलच्या ठरावाची अंमलबजावणी पूर्णपणे
करीत नाहीत, तेव्हा अशा लोकांच्या शंकानिरसनासाठी मी येथे आलो
आहे. माझी मते. यापूर्वीच मी अनेकवेळा बोलून दाखविली आहेत. त OCR DME MORES SSE म वि
जनता : ४ सप्टेंबर १९३७.