६-११-१९३७ बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करवून घेतले पाहिजेत - Page 86

१०७
बहुजन समाजावर अन्याय [होणार ] [नाही ]
असे कायदे करवून घेतले पाहिजेत

मु. मसूर, जि. सातारा येथे पूर्वी ठरल्याप्रमाणे ता. ६ नोव्हेंबर १९३७ रोजी सातारा जिल्हा महार परिषदेचे ७ वे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रीतीने पार पडले. यावेळी डॉक्टरसाहेबांच्या जंगी स्वागतास हजारो स्त्रीपुरुषांचा अलोट जमाव जमला होता. परिषदेच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोटारमधून दीड दोन मैल लांबीची मिरवणूक काढण्यात आली. पांचगणी, दहिगाव व इतर ठिकाणच्या समता सैनिक दलांनी या मिरवणुकीची शिस्त वाखाणण्यासारखी ठेविली होती. डॉक्टरसाहेबांच्या गगनभेदी जयजयकाराने ते सारे वातावरण दुमदुमून गेले होते, स्पृश्यवर्गीय समाज बांधवांना हे अपूर्व आणि उत्साही वातावरण पाहून कौतुक व आश्चर्य वाटल्यास नवल नाही. या मिरवणुकीत अध्यक्षसाहेबांबरोबर स्वागताध्यक्ष मि. के. एस. सावंत, एम. एल. ए. हे मोटारीत बसले होते. त्यांच्या मागील. मोटारीत आमदार श्री. राजाराम भाऊ भोळे, अं. विनायकराव गडकरी, अण्णासाहेब पोतनीस वगैरे पुढारी मंडळी बसली होती. सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास ही प्रचंड मिरवणूक परिषदेसाठी खास उभारलेल्या भव्य मंडपात येऊन | दाखल झाली. डॉ. बाबासाहेबांचे दर्शन होण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंडपाच्या प्रवेशद्वारी लोटू लागल्या होत्या. त्यामुळे, परिषदेची व्यवस्था ठेवणे काही वेळ कठीण झाले होते. समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परिषदेची सारी व्यवस्था उत्तम प्रकारे राखण्यात आली. |

स्वागत गीत झाल्यावर रीतसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. त्यावेळी टाळ्यांचा व जयजयकारांचा प्रचंड ध्वनी झाला. त्यानंतर स्वागताध्यक्ष मि. खंडेराव एस. सावंत यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय करून देताना त्यांचे एका साधु उक्तीत वर्णन केले, ते असे ' झाले बहू , आहेत बहू होतील बह्‌, परंतु या सम हा ' हे त्यांनी केलेले डॉक्टरसाहेबांविषयीचे वर्णन | अतिशयोक्तीचे खास नव्हे !

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुंनो

मसूर या गावाचे नाव घेतले की मला माझ्या बालपणी अस्पृश्यतेसंबंधी अनुभवलेल्या कडू अनुभवांची आठवण होऊन डोळ्यात अजूनही अश्रू उभे

_ TT जनता : १३ आणि २० नोव्हेंबर १३७.