बहुजन समाजावर अन्याय होणार . . . .. करवून घेतले पाहिजेत ४९
राहतात. माझी या गावी गेल्या ३५ वर्षानंतर ही दुसरी खेप आहे. या भागात
गोरेगावला ज्यावेळी तळे बांधले, त्यावेळी त्या कामावर माझे वडील कॅशियर
म्हणून काम करीत होते. मी, माझे दोघे बंधु आणि माझ्या बहिणीचा मुलगा असे
चौघेजण सातारा येथे शिक्षणासाठी राहात होतो. माझी मातोश्री त्यावेळी
. स्वर्गवासी झाली होती. आम्हा सर्व मुलांवर आमचे वडिलांचे एक स्नेही,
शेजारी राहात असत, ते लक्ष ठेवीत असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या
वडिलांनी आम्हास गोरेगावी बोलाविले. आम्ही तेथे येणार असल्याचे एक पत्र
अगोदर एका हमालाबरोबर पाठविले होते. आम्हाला रेल्वेगाडीने जाण्यात मोठा
आनंद झाला. कारण यापूर्वी ही गाडी इंजिनने कशी चालते, हे पाहिले
नव्हते. त्यामुळे आम्हास एक प्रकारची आतुरता लागली होती. प्रवासासाठी
श्रवीन कपडे, जरीच्या टोप्या वगैरे खरेदी करून आम्ही साताऱ्याहून [पाडली ]
स्टेशनावर गाडीत बसलो. तेथून मसूर पर्यंतचा प्रवास अत्यंत आनंदात
गेला. मसूर स्टेशनवर पोचताच आम्हास कोणीच उतरून घ्यावयास आलेले
नाही, हे पाहून आश्चर्य वाटले. दुपारी ४ ते रात्री ७ वाजेपर्यंत आम्ही मसूर
स्टेशनवर बसून राहिलो. आम्ही असे तिष्ठत बसलेले पाहून स्टेशन मास्तरने
आमची चौकशी केली. आम्ही आमची जात सांगताच स्टेशन मास्तर
चमकला. शेवटी त्याने मोठ्या मुश्किलीने गोरेगावास जाण्याकरिता एक गाड़ी
ठरवून दिली पण गाडीवानाला आमची जात सांगताच तो बिचकला. तो आम्हास
भ्रहाराची पोरे म्हणून नेण्यास तयार होईना. शेवटी आमच्या बंधुने अशी तडजोड
केली की ठरलेल्या भाड्यापेक्षा एक रुपया अधिक [देऊन ] [गाडी ] [आम्ही ] [हाकू ] [व ]
झ्राडीवानाने बरोबर चालावे. तडजोड मान्य करून त्याने गाडीस बैल जुंपले
ब आम्ही गाडी हाकू लागलो. पुढे मसूर गावच्या नाल्याजवळ गाडी उभी ॥ कैली. त्यावेळेस आम्हास अत्यंत तहान लागली होती. आम्ही गाडीवानास
कुठचे पाणी प्यायचे असे विचारताच त्याने अस्पृश्य लोकांसाठी असलेला । शेणसड्याने भरलेला खड़ा दाखविला. येथील दुर्गधी पाणी पिणे अशक्य
होते. आम्हाला तहान फार लागली [होती. ] परंतु या पाण्याच्या गैरसोयीमुळे | मुकाट्याने पुढचा मार्ग धरावा लागला. रात्र पडत होती. पाण्याने व भुकेने
जीव तळमळत होते. दुसऱया स्पृश्यांच्या नाल्यावर पाणी पिण्यास [किंवा ] [मागून ]
घेण्यास आम्हास मज्जाव होता. मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही टोलनाक्यावर | आलो. तेथेही महार जातीमुळे पाणी मिळाले [नाही. ] अखेर अशा घायाळ | अवस्थेत आम्ही गोरेगाव मुक्कामी [पोहोचलो. ] वडिलांनी आम्हास असे अगोदर
कळविल्याशिवाय का आलात म्हणून [विचारले. ] त्यावरून आमचे एका इसमाबरोबर
पाठविलेले पत्र त्यांना अजून मिळाले [नव्हते. ] त्यांना आमची ही वाटेतली
शोचनीय अवस्था पाहून गहिवर आला. या [प्रवासाने ] [' ] आपण [अस्पृश्य ] [' ] [आहोत, ]