६-११-१९३७ बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करवून घेतले पाहिजेत - Page 88

५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपणास कमी लेखतात, आपले पाणवठे गलिच्छ ठिकाणी असतात, स्पृश्य लोक आपला विटाळ मानतात वगैरे संबंधीचा पहिला अनुभव माझ्या आयुष्यात मला मिळाला. माझ्या बालमनाला ही गोष्ट फारच लागून राहिली आणि ती गोष्ट

आज येथेच जमलेल्या हजारो लोकांपुढे सांगण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही

त्यावेळी वाटले नव्हते. असो.

आज येथे आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाची आपणा सर्वांना जाणीव आहे. हिंदुस्थानावर लादलेल्या नवीन सुधारणात भरपूर दोष व व्यंगे असल्यामुळे त्या पूर्ण जबाबदारीचे स्वराज्य प्राप्त करून देण्यास असमर्थ

आहेत. प्रांतिक राज्यकारभारातील कित्येक घटना, विशेषतः सेकंड चेंबरची घटना ही आपल्या पक्षास आक्षेपार्ह वाटते. तथापि, या नवीन सुधारणा राबविण्यास हरकत नाही. मात्र जबाबदारीच्या स्वराज्याचे स्वरूप निष्प्रभ करून टाकण्याजोगे जे खास व अनियंत्रित स्वरूपाचे अधिकार गव्हर्नरास मिळालेले आहेत त्यांचा उपयोग या मुदतीत होऊ नये याबद्दल स्वतंत्र मजूर पक्ष जागृत राहील. तसेच अस्पृश्य बांधव, मजूर व शेतकरी यांचे नाते इष्ट कसे होईल याचा विचार करून सर्वसाधारण श्रमजीवी वर्गासाठी विधायक कार्य करण्याचा आपल्या पक्षाचा संकल्प आहे. तुम्हास ठाऊक असेलच की गिरणीतील मजूर वर्गात स्पृश्य मजूर व अस्पृश्य मजूर असा उघड भेदभाव आहे. स्पृश्य मजुरास कापड खात्यात काम मिळते व तो जॉबरचे जागेपर्यंत वर चढू शकतो. परंतु अस्पृश्य मजुरास तो कितीही लायक असला तरी त्याला कापड खात्यात काम मिळत नाही. तो तेलवालाच राहतो. सर्वसाधारणपणे मजुरांची परिस्थिती हलाखीची व कष्टमय आहे. स्पृश्य मजुरांचे दारिद्र्य मालकशाहीमुळे तर अस्पृश्य मजुरांचे दारिद्र्य, मालकशाही अधिक अस्पृश्यता या दोहोमुळे आहे. परंतु दु:खाची गोष्ट ही की काँग्रेसमधील व बाहेरील मजुरांचे पुढारी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचा सवतासुभा स्थापन करण्यास जी काही कारणे आहेत त्यापैकी हे एक होय. मजुरांना जातीभेदाने अगर वर्गभेदामुळे त्यांच्या लायकीला धक्का मिळणार नाही व त्यांचा उन्नतीचा मार्ग सुखकर होईल असा प्रयत्न आज काँग्रेस अगर इतर पक्षाचे मजूर पुढारी करू शकत नाहीत. कारण काँग्रेसचे पुढारी आज भांडवलवाल्यांच्या कचाटीत सापडल्यामुळे गरीब मजुरांचे व शेतकऱ्यांचे कल्याण त्यांच्याकडून होऊ शकत नाही. काँग्रेस 'भांडवलवाल्यांचे हित करणार व गरिबांचेही हित करणार' अशी घोषणा करते. अशा दुटप्पी परिस्थितीत एका म्यानात दोन सुऱ्या राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या श्रमजिवी वर्गाने काँग्रेसच्या विश्‍वासावर राहणे व्यर्थ आहे. काँग्रेसचे पंचप्राण महात्मा गांधी यांच्या मनाचा ठाव मला

एनडव्ल्यू-६९-४-ब