बहुजन समाजावर अन्याय होणार ..... करवून घेतले पाहिजेत ५१
पूर्णपणे आहे. त्यांचे हृद्गत जितके मला माहीत आहे तितके तुम्हास
नाही. त्यांचा व माझा जो परिचय आहे त्यावरून पाहता महात्माजी तुमचे
कल्याण करू शकत नाहीत. त्यांचे व आपले या बाबतीतले मार्ग अगदी भिन्न
आहेत. ज्याला भाकरी पाहिजे त्याला देवळांचा काय उपयोग ? गेल्या
राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्य समाजाविषयी मोठा दुर्घट प्रश्न होता.
नोकरशाहीची सत्ता काढून ती बहुजन समाजाचे हाती देताना त्यातील काही अंश
अस्पृश्यांचे हाती द्या, असे सर्वाचे म्हणणे होते. परंतु हे महात्माजीच त्यावेळी
अस्पृश्यांच्या हक्कांविरूद्ध गेले. मात्र मुसलमान, खिस्ती वगैरे अल्पसंख्यांकांना
या सत्तेतील काही अंश देण्यासाठी ते तयार होते. अशा बिकट प्रसंगी या
हिंदुंच्या महान पुढाऱ्याशी आपल्या स्वतंत्र हक्कासाठी झगडावे लागले. अस्पृश्यांचे
कल्याणकर्ते म्हणविणारे हे हिंदुस्थानचे महात्मे या वेळी आपल्याविरुद्ध जावयास
नको होते. ते आपले खरेखुरे कल्याणकर्ते असते तर त्यांच्याशी वादविवाद
करण्यात मला माझी शक्ती खर्च करण्याचे कारण पडले नसते.
महात्माजीस स्वराज्यासाठी चटकन एक कोटी रुपये देणारे स्पृश्य लोक
अस्पृश्यता निवारण्यास पाच, सहा लाखापर्यंत वर्गणी देण्यास समर्थ का होऊ
शकत नाही ? यावरून स्पृश्य समाजाला अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची
किती तळमळ आहे, हे दिसून येते. ही जुलमाच्या रामरामाची गांधीजींची चळवळ
आपला उत्कर्ष कसा काय करणार ? आणि तुमचा विटाळ, तुमचेवरील जोर
जुलुम, तुमची सामाजिक हाल अपेष्टा, मानहानी, दारिद्र्य हे लोक कशा रीतीने
नष्ट करणार ? खरे पाहिले असता स्पृश्य हिंदू दिखाऊ कामे करण्यात पटाईत
आहेत. आतून तुमच्या सामाजिक जीवनात काटे पसरविण्याचा ते नेहमी नेटाने
प्रयत्न करतात. श्रीमंत, सावकार, खोत, भांडवलवाले हे तुमचे आर्थिक जीवन कष्टप्रद करीत आहेत. तर इकडे बहुजन समाजाची प्रातिनिधिक काँग्रेस दिमाखाने काँग्रेस हीच अस्पृश्यांची, गोरगरिबांची म्हणविणाऱ्या लोकांची, रंजल्या गांजलेल्यांची असे तोच्याने म्हणत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेस ही संस्था जर आपली कल्याणकर्ती आहे, असे वाटले असते तर मी मोठ्या नंदाने तीमध्ये सामील झालो असतो पण मला काँग्रेसकडून आपल्या समाजाचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे हित होत नाही, असे वाटल्यावरून मी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आहे.
या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. तो काँग्रेसमध्ये सामील झाला. म्हणून